Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष ४५ लाख ७० हजार ३९६ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१.९१ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यामाहा छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ९१.३१ टक्के लातूर विभागातील पाच जिल्ह्यात आणि झालेल्या सुमारे ९२.५६ टक्के क्षेत्राचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत खरिपाचे सर्व साधारण क्षेत्र २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रतीक्षा ९१.३१ टक्के म्हणजे १९ लाख ५५ हजार ८५१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
लातूर कृषी विभागात पाच जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २८ लाख ३०० हजार ७०४ हेक्टर असून प्रत्यक्षात ९२.३६ टक्के म्हणजे २६ लाख १४ हजार ५४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जे काही जिल्ह्यात अजून अपेक्षित पेरणी झाली असल्याची स्थिती नाही. अनेक भागांत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली. पाऊस अपेक्षेप्रमाणे पडत नसून केवळ पीक जगण्यापुरता पाऊस पडावा अशी वेळही अनेक भागांत येते आहे.
पावसाचा टक्का कमीच...
यंदा पावसाची सुरुवात वेळेपूर्वी आणि चांगली झाली असली तरी १६ जुलैपर्यंतचा सरासरी व प्रत्यक्ष पाऊस लक्षात घेता पावसाचा टक्का कमीच असल्याची स्थिती आहे. यंदा १६ जुलैपर्यंतचे सरासरी पावसाच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५ टक्के, जालन्यात ७०.७ टक्के, बीडमध्ये सर्वांत कमी ४२.६ टक्के, लातूर जिल्ह्यात ४४.२ टक्के, धाराशिवमध्ये ६८.५ टक्के, नांदेडमध्ये ७४.८ टक्के, परभणीत ४६.३ टक्के, तर हिंगोलीत ६८.६ टक्केच पाऊस झाल्याची स्थिती आहे. बीड, परभणी, लातूरमध्ये सरासरी पावसाच्या प्रमुख ५० टक्केही पाऊस जाणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रिकामी पावसाच्या अनेक भागात नितांत गरज भासते आहे.
सोयाबीन, मका अपेक्षेच्या पुढे जाऊन पेरणी
मराठवाड्याचे महत्त्वाचे पीक म्हणून ओळख असलेल्या कपाशी व सोयाबीनपैकी केवळ सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्राच्या थोडी पुढे जाऊन पेरणी झाली. कपाशीची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित लागवड झाल्याची अजूनही स्थिती नाही. दुसरीकडे मकाची लागवड मात्र सर्वसामान्य क्षेत्राच्या तुलनेत बऱ्यापैकी पुढे जाऊन झाली आहे.
जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
छ.संभाजीनगर ६८१९०३ - ६६६६३१
जालना ६५११७३ - ६१७७१५
बीड ८०८९४५ - ६७१५०४
लातूर ५८६१०१ - ५६१२३६
धाराशिव ५५४१६० - ५१३२३५
नांदेड ७६१५७६ - ७२७०६१
परभणी ५१८४६८ - ४६५२०१
हिंगोली ४१०३९८ - ३४७८०९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.