Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीत ९ हजार हेक्‍टरवर पेरणी

Rabi Season : खरिपात पावसाने ओढ दिली, असून परिणामी रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. रब्बी हंगामातील ८ हजार ९८९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : खरिपात पावसाने ओढ दिली, असून परिणामी रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. रब्बी हंगामातील ८ हजार ९८९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यामुळे रब्बी पेरणी क्षेत्रात घटीची शक्यता आहे. ऊस हंगाम पुढे गेल्यामुळे बागायत गहू, हरभरा पिकाच्या पेरण्या रखडल्या आहेत. रब्बीसाठी शेतकऱ्यांना मॉन्सुनोत्तर पावसाची आशा आहे.

जिल्ह्यात काही तालुक्यांत ढगाळ तर काही तालुक्यांत सूर्यप्रकाश असे वातावरण आहे. जानेवारी ते डिसेंबरमध्ये सरासरी १९७१.६ मिलिमीटर पावसाचे प्रमाण असते. जूनमध्ये फक्त नऊ दिवस, ऑक्टोबरमध्ये तीन दिवस, सप्टेंबरमध्ये १८ दिवस, ऑगस्टमध्ये १७, दिवस जुलैमध्ये २९ दिवस पाऊस झाला.

एकूण प्रत्यक्ष १००६.५ मिलिमीटर, म्हणजे ५४.४९ टक्के पाऊस झाला. नोव्हेंबरमध्ये सरासरी पर्जन्यमान २८.१ मिलिमीटर इतके असून, २५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, रब्बी हंगामासाठी पाऊस उपयुक्त आहे. पाच वर्षांत सर्वांत नीचांकी पावसाची नोंद झाली. गतवर्षी सप्टेंबरअखेर ७६.४ टक्के पाऊस झाला होता. याचा परिणाम खरीप आणि रब्बीवर झाला आहे.

रब्बी हंगामात जिल्ह्यात सर्वसाधारण २१ हजार ७ हेक्‍टर क्षेत्र असते. यामध्ये ज्वारी ११८५४ हेक्टर, गहू १६५९ हेक्टर, मका १२९३ हेक्टर, तृण धान्य १५०, हरभरा ४७७३, कडधान्य ११३६, तीळ ३९, हेक्टर पिकांचा समावेश आहे.

सोयाबीन पिकाची काढणी झालेले क्षेत्र, येथे पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी रब्बी ज्वारीची पेरणी सुरू आहे. ८९८९, म्हणजे ४२.७९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारी ६१७३ हेक्टर, गहू १६० हेक्टर, मका ६५६ हेक्टर, हरभरा १६०१ हेक्टर, इतर कडधान्य २९९ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

आठ नोव्हेंबरअखेर ६.९ मिमी, ९ रोजी १५.० मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस रब्बीसाठी उपयुक्त आहे. पेरणी झालेल्या पिकांची उगवण समाधानकारक आहे. या क्षेत्रात भांगलणीची कामे सुरू आहेत. उशिरा ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे बागायती गहू, हरभरा पिकांची पेरणी रखडली आहे.

उसाच्या वाढीवर परिणाम

२०२३-२४ हंगामात उपलब्ध होणारा ऊस, १,८८,४५९ हेक्टर असून आडसाली क्षेत्र १७,३७४ हेक्टर, पूर्वहंगामी १०,२१२ हेक्टर क्षेत्रावर लागण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे विहिरीच्या पाण्यावर अवलंबून उसाच्या पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे.

यामुळे उत्पादनामध्ये ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे. पूर्व भागातील तालुक्यांमध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे. उसावर तांबेरा रोगाचा तसेच हुमणी व लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना होत असल्याचा अहवाल कृषी खात्याने दिला आहे.

शेतकऱ्यांनी पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन हरभरा, ज्वारी ही कमी कालावधीची कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. जलसंधारण विभागानेही शेतीला पाण्याची कमतरता भासेल, असे सांगितले आहे. रब्बी हंगामातील पीकविमा योजना पोर्टल सुरू झाले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे.
- अरुण भिंगारदेवे, जिल्हा कृषी अधीक्षक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT