Rabi Sowing : रब्बीत १७ टक्केच पेरणी

Rabi Season Update : रब्बी पेरण्यांना अद्यापही गती आलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी त्यांच्या लाभक्षेत्रातही पेरण्या झालेल्या नाहीत.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Amravati News : रब्बी पेरण्यांना अद्यापही गती आलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला तरी त्यांच्या लाभक्षेत्रातही पेरण्या झालेल्या नाहीत.

अमरावती जिल्ह्यात २ लाख १८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रात रब्बी हंगामात पेरणी कृषी विभागाने प्रस्तावित केली आहे. हे क्षेत्र गृहित धरून बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा हा अंदाज हवामान व खरिपातील स्थिती बघता चुकू लागला आहे. यावर्षी १ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होण्याचा अंदाज आहे.

Rabi Sowing
Wheat Sowing : बागायती गव्हाची उशिरा पेरणी

गहू व हरभरा ही रब्बी हंगामातील मुख्य पिके आहेत. सोयाबीनचे शेत मोकळे झाल्यानंतर या पिकांच्या पेरणीस वेग येतो. सध्या सोयाबीनचा हंगाम जोरात आहे. बाजारात नवीन सोयाबीन आला आहे. कापसाच्या हंगामासही प्रारंभ झाला असला तरी ते क्षेत्र मोकळे होण्यास अवधी आहे.

दरम्यान जिल्ह्यात १ लाख ४८ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत केवळ २४ हजार ९१८ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. पेरणीचे हे प्रमाण सरासरी १७ टक्के इतके आहे.गतवर्षी चण्याला मिळालेला भाव व बाजारातील स्थिती शेतकऱ्यांच्या बाजूची नसली तरी यंदाही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी वाढविण्याची शक्यता आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : मराठवाड्यात रब्बी क्षेत्र निम्म्यावर

९८८ हेक्टरवर गव्हाची पेरणी

आतापर्यंत २३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची तर ९८८ हेक्टरवर गव्हाची पेरणी आटोपली आहे. हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी धामणगावरेल्वे तालुक्यात ५६९५ हेक्टरवर झाली आहे. तर खारपाणपट्ट्यातील दर्यापूर व अंजनगावसूर्जी तालुक्यात अनुक्रमे १८६३ व १८४ हेक्टरमध्ये हरभरा पेरणी झाली आहे.

गहू कमी राहण्याचा अंदाज

दोन पाळी पाण्यात व बहुतांश हिवाळ्यातील दरावर येणारे हे पीक असल्याने शेतकऱ्यांचा कल त्याकडे आहे, असे सांगण्यात आले आहे. गव्हाला पाणी अधिक लागत असल्याने गव्हाची पेरणी यंदाही कमी राहण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ९८८ हेक्टर क्षेत्रच गव्हाखाली आले आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीस डिसेंबरमध्ये गती येऊ शकणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com