Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : मराठवाड्यात ४७ लाख ८६ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग अंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २० लाख ९० हजार १९८ हेक्टर आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील पेरणी जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्वसाधारण ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४७ लाख ८६ हजार ३४५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

लातूर व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही कृषी विभागाअंतर्गत जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९८ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना व धाराशिव जिल्हा पेरणीत आघाडीवर आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग अंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २० लाख ९० हजार १९८ हेक्टर आहे.

त्या तुलनेत २५ जुलै अखेरपर्यंत २० लाख ५८ हजार ४३३.६० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. ही पेरणी सर्वसाधारणच्या तुलनेत ९८.४८ टक्के आहे. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे पेरणी झाली आहे.

लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर आहे. त्यापैकी २७ लाख २७ हजार ९११.८० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ही पेरणी ९८.५९ टक्के आहे. धाराशिव जिल्ह्यातील पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक झाली आहे.

काही ठिकाणी कपाशीवर ‘मर’चा प्रादुर्भाव

गत काही दिवसांत सतत होत असलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर ‘मर’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. याशिवाय वाढीच्या अवस्थेतील सोयाबीनवर काही ठिकाणी पाणी खाणारी अळी, उंट अळीचा प्रादुर्भाव आहे. सोयाबीन व कपाशी पिकाची वाढ समाधानकारक आहे.

खरिपाची सर्वसाधारण आणि प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर)

जिल्हा सर्वसाधारण प्रत्यक्ष टक्केवारी

छ. संभाजीनगर ६८४७१६ ६५७६०५ ९६

जालना ६१९६९५ ६२५९७० १०१.०१

बीड ७८५७८६ ७७४८४८ ९८.६१

लातूर ५९९४५६ ५९८८३२ ९९.९०

धाराशिव ५०४७३५ ५३६७११ १०६.३४

नांदेड ७६६८०९ ७४८१५१ ९७.५७

परभणी ५३४९०० ५२०५२८ ९७.३१

हिंगोली ३६१०५४ ३२३६८८ ८९.६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT