Dharashiv News: जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांच्या तुलनेत संख्येने सर्वाधिक असलेल्या २०८ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. हा पाणीसाठा ११ टक्क्यांनी घटून ८८.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. १७ मध्यम प्रकल्पांत ९७.३०, तर मोठ्या असलेल्या एका प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे..जिल्ह्यात एकूण २२६ प्रकल्प आहेत. त्यात सध्या एकूण ९२.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठ्या असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. या प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्यम १७ प्रकल्पांतील पाणीसाठाही चांगल्या प्रकारे टिकून आहे. त्यात या आठवड्यात काहीशी वाढ देखील झाली आहे. मात्र, २०८ लघू प्रकल्पांची स्थितीउलट आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने घटत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे..Water Storage : सिंचनामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वेगाने घट.२२६ पैकी २०४ प्रकल्प यंदा शंभर टक्के भरले होते. मात्र, अनेक प्रकल्पांना लागलेली गळती आणि सांडवा फोडल्याने प्रकल्पांतील पाणीसाठा घटू लागला आहे. सध्या शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असलेले १४७ प्रकल्प उरले आहेत. ५७ प्रकल्पांतील पाणीसाठा खालावला आहे. त्यातही लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे..जिल्ह्यातील एकूण २२६ असलेल्या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता ८६३.८८७ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी प्रकल्पांत सध्या ८०९.५६८ दलघमीवर आला आहे. एकूण प्रकल्पांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७२८.८०४ दलघमी असून सध्या प्रकल्पांत ६७४..६८२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे..Water Shortage : नांदेडमध्ये प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट.दरम्यान, २२६ पैकी सध्या १४७ प्रकल्पांतच १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय ५७ प्रकल्पांमध्ये ७५ ते ९९ टक्के, तर १३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्केदरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. २५ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेले सध्या सात प्रकल्प आहेत. २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेला एक प्रकल्प आहे, तर जोत्याखाली एक प्रकल्प आहे..प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिती (दलघमीमध्ये)प्रकल्प क्षमता प्रत्यक्ष साठा उपयुक्त पाणीसाठा टक्केसीना कोळेगाव १५०.४९१ १५०.४९१ १००मध्यम प्रकल्प (१७) २२८.४५७ २२३.८५७ ९७.७६लघू प्रकल्प (२०८) ४८२.९१७ ४३५.२२० ८८.५९एकूण (२२६) ८६३.६८७ ८०९.५६८ ९२.५७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.