Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : साताऱ्यात ८६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी

Kharif Season : गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा न झाल्याने अजूनही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के पेरणीची कामे उरकली असून, यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकांचा ८६ हजार ९१३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जमिनीतील ओली पिकांची उगवण चांगली असून, पिकांना पाण्याची गरज भासू लागल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

जिल्‍ह्यात खरीप हंगामातील पेरणीची कामे सध्या सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा न झाल्याने अजूनही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. दरामुळे सोयाबीनच्या क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र या हंगामात शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकास प्राधान्य दिले आहे.

खरीप हंगामात कृषी विभागाकडून दोन लाख ८८ हजार ४९४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्‍चित केले आहे. त्यापैकी दोन लाख ५० हजार ७५१ हेक्टर म्हणजेच ८७ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पेरा झालेला आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, ८६ हजार ९१३ हेक्टर (११६ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ३८ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भाताची ४३ हजार ९७८ हेक्टर सर्वसाधारण क्षैत्रापैकी २४ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भुईमूग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून भुईमुगाचे २९ हजार ४३५ सर्वसाधारण क्षैत्रापैकी २६ हजार ८१९ हेक्टर क्षैत्रावर लागवड झाली आहे.

खरीप ज्वारीचे ११ हजार १५३ हेक्टर सर्वसाधारण क्षैत्रापैकी ६८१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्याचे १५ हजार १९० हेक्टरपैकी १४ हजार ३६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र सध्या पावसाने नसल्याने शेतकऱ्यांचा चिंतेत भर पडली आहे. पिकासाठी पावसाची गरज भासत असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT