सातारा जिल्ह्यात रब्बीची पेरणी Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के क्षेत्रावर पेरणी

Rabi Season : सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. २८.६९ टक्के क्षेत्रावर पेरणी बुधवारअखेर (ता. १) पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. २८.६९ टक्के क्षेत्रावर पेरणी बुधवारअखेर (ता. १) पूर्ण झाली आहे. माण तालुक्यात सर्वाधिक १९ हजार २२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पाऊस नसल्यामुळे ओलीअभावी पेरणीची कामे संथगतीने सुरू आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १३ हजार २०९ हेक्‍टर आहे. त्यापैकी (ऊस वगळून) ६१ हजार १६१ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच २८.६९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात माण तालुक्‍यात सर्वाधिक १९ हजार २२६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३५ हजार ५३५ हेक्‍टर आहे. त्यापैकी ५४ हजार ३२८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार २०९ हेक्‍टर आहे. त्याची चार हजार ८९३ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हरभरा पिकांचे २७ हजार ७५३ सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी १,४८६ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणे रब्बीतही क्षेत्र नापेर राहणार आहे.

रब्बी हंगामासाठी ठेवलेल्या शेतजमिनीत कामे सुरू झाली आहेत. ज्या ठिकाणी थोड्या प्रमाणात पाऊस झाला, त्या ठिकाणी पेरणी कामे सुरू झाली आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणी झालेले क्षेत्र जास्त आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT