Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Swing : हिंगोली जिल्ह्यात रब्बीची २ लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र कृषी आणि महसूल विभागाकडून बुधवारी (ता. ७) अंतिम करण्यात आले.त्यानुसार जिल्ह्यात यंदा २ लाख १२ हजार ४४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी (२०२२-२३)च्या १ लाख ८१ हजार ५९८ च्या तुलनेत यंदाच्या रब्बी पेरणीक्षेत्रात ३० हजार ८५१ हेक्टरने वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील हरभरा, ज्वारी, गहू, करडई पिकांच्या पेरणीत वाढ झाली आहे. ज्वारी, हरभरा, करडईचा पेरा सरासरीहून अधिक तर गव्हाचा पेरा सरीसरीपेक्षा कमी आहे. एकूण रब्बीच्या क्षेत्रामध्ये एकट्या हरभऱ्याचे क्षेत्र ७३.७८ टक्के आहे. हिंगोलीत रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे. यंदा प्रत्यक्षात २ लाख १२ हजार ४४९ हेक्टरवर पेरणी झाली.

तृणधान्यांची ५५ हजार पैकी ५३ हजार ५४७ हेक्टर पेरणी झाली. त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ हेक्टर असतांना १६ हजार ९०० हेक्टरवर, गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३६ हजार ४६ हेक्टर , मक्याची ९७१ पैकी ४७९ हेक्टर पेरणी झाली. गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा ज्वारीच्या पेरणीत ८ हजार ७३८ हेक्टरने तर गव्हाच्या पेरणीत ३ हजार ८०९ हेक्टरने वाढ झाली आहे. मक्याच्या क्षेत्रात ४३० हेक्टरने घट झाली आहे.

कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ असतांना प्रत्यक्षात १ लाख ५६ हजार ७६३ हेक्टरवरपेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ असतांना प्रत्यक्षात १ लाख ५६ हजार ७५० हेक्टर गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याच्या पेरणीत १७ हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

गळीत धान्यांचे सरासरी क्षेत्र ८४२ हेक्टर असतांना प्रत्यक्षात २ हजार १३९ हेक्टर पेरणी झाली. त्यात करडईचे सरासरी क्षेत्र हेक्टर असतांना प्रत्यक्षात १ हजार हेक्टर, तिळाची १८.६६ पैकी ४९ हेक्टर, सुर्यफुलाची ३५१ हेक्टर, चवळीची ४ हेक्टर पेरणी झाली आहे. करडईच्या पेरणीत ७३८ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा सर्वच तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

हिंगोली जिल्हा २०२३०२४ रब्बी अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली ३१०७४ ३६१३३ ११६.२८

कळमनुरी ५०१४६ ५३४१६ १०६.५२

वसमत ४२०१९ ४६७०५ १११.१५

औंढा नागनाथ २५७२६ ४१०६० १५९.६०

सेनगाव २७९२६ ३५१३५ १२५.८१

तुलनात्मक पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक २०२२-२३ २०२३-२४

हरभरा १३८८७७ १५६७५०

ज्वारी ८१६२ १६९००

गहू ३२२३७ ३६०४६

मका ९०९ ४७९

करडई ६०४ १३४२

सूर्यफुल ३५० ३५१

तीळ ७७ ४९

जवस ४ ४

नोव्हेंबर मधील पाऊस, सिध्देश्वर, उर्ध्व पैनगंगा कालव्याचे पाणी यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्र वाढले. गतवर्षीच्या तुलनेत हरभरा, ज्वारी, गहू, करडईचा पेरा जास्त झाला आहे.
- शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT