Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीची २ लाख हेक्टरवर पेरणी

Rabi Sowing : कृषी व महसूल विभागांकडून परभणी जिल्ह्यातील यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र गुरुवारी (ता. १) अंतिम करण्यात आले आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon

Parbhani News : कृषी व महसूल विभागांकडून परभणी जिल्ह्यातील यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र गुरुवारी (ता. १) अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ३३१ हेक्टर (१०७.५८ टक्के) पेरणी झाली आहे.

गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदाच्या पेरणी क्षेत्रात ४ हजार १३१ हेक्टरने घट झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ज्वारीच्या व करडईच्या क्षेत्रात वाढ झाली तर गहू व हरभऱ्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा जास्त तर ज्वारी, गहू, करडईचा पेरा यंदा कमी झाला आहे.

यंदाच्या एकूण रब्बी क्षेत्रात एकट्या हरभरा पिकांचे क्षेत्र ५२.११ टक्के आहे. ज्वारीचे क्षेत्र ३७.६२ टक्के, गव्हाचे क्षेत्र ९.१३ टक्के, करडईचे ०.७१ टक्के आहे. २०२३ च्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे जमिनी ओलाव्याअभावी रब्बीचे हजारो हेक्टर क्षेत्र यंदा नापेर राहिले असते. परंतु नोव्हेंबर महिन्याअखेरीस झालेल्या मान्सून्नोत्तर पावसानंतर उपलब्ध ओलावा, काही भागात विहिरीच्या पाणी पातळीत झालेली थोडी वाढ. त्यामुळे रब्बीचा पेऱ्यात वाढ झाली आहे.

सलग चौथ्या वर्षी यंदाही सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला. परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर असतांना प्रत्यक्षात पर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ हेक्टरवर (१०७.५८ टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा तृणधान्यांमध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात २३ हजार हेक्टर ९०२ हेक्टरने वाढ झाली आहे. परंतु गव्हाच्या पेरणीत ६ हजार ५०० हेक्टरने व मक्याच्या क्षेत्रात ४५१ हेक्टरने घट झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : पुणे विभागात एक लाख ६३ हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून दूर

कडधान्यांमध्ये हरभऱ्याच्या क्षेत्रात २० हजार ९६४ हेक्टरने घट झाली आहे. गळितधान्यांत करडईच्या क्षेत्रात ५६७ हेक्टरने वाढ झाली आहे. जवसाच्या क्षेत्रात १९.२ हेक्टरने घट झाली आहे. यंदा शेतकऱ्यांनी तीळाचा पेरा ३१ हेक्टरपर्यंत वाढला परंतु सूर्यफुलाच्या पेरणी नोंद नाही. यंदा तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १ लाख ३७ हजार २०९ हेक्टर (८८.५९ टक्के) पेरणी झाली आहे.

मान्सून्नोत्तर पावसामुळे मर लागल्यामुळे हरभरा मोडून ज्वारीची पेरणी केली. कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी १ लाख ५१ हजार ९८२ हेक्टर (१३५.३७ टक्के) पेरणी झाली. गळीतधान्यांची ३ हजार ६४४ पैकी २ हजार १३९ हेक्टर (५८.७१ टक्के) पेरणी झाली. यंदा परभणी, सेलू, सोनपेठ, गंगाखेड या ४ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी तर जिंतूर, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा या ५ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा

तुलनात्मक रब्बी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वर्षे सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

२०२०-२१ २१५९६१ २५९९०० १२०.३९

२०२१-२२ २१५९६१ २५४४६७ ११७.८२

२०२२-२३ २७०७९४ २९५४६२ १०९.११

२०२३-२४ २७०७९४ २९१३३१ १०७.५८

पीकनिहाय अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ११३०८९ १०९६२४ ९६.९४

गहू ३९३०८ २६६२६ ६७.७४

मका २०८६ ८८८ ४२.५६

हरभरा ११२१७० १५१८२९ १३५.३६

करडई ३३७१ २०७३ ६१.५०

तीळ ३३.६४ ३१.०० ९२.१५

जवस ११९ १७ १४.२९

परभणी जिल्हा रब्बी २०२३-२४

अंतिम पेरणी क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५७९०० ५६७८२ ९८.०७

जिंतूर ५३७३० ६४२७२ ११९.६२

सेलू ३३५६१ २६१०१ ७७.७७

मानवत १६११९ २१०७२ १३०.७३

पाथरी १७०७२ १९०३९ १११.५२

सोनपेठ १५६९८ १४३७१ ९१.५५

गंगाखेड ३२०८६ २९०८७ ९०.६५

पालम २०१३० २११५० १०५.०६

पूर्णा २४४९५ ३९४५७ ११९.६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com