Rabi Sowing : नांदेडला रब्बीचा साडेतीन लाख हेक्टरवर पेरा

Rabi Season : नांदेड जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत रब्बी हंगामाची पेरणी विक्रमी क्षेत्रावर झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत रब्बी हंगामाची पेरणी विक्रमी क्षेत्रावर झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या १५५ टक्क्यांनुसार तीन लाख ४८ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा तर दहा हजार हेक्टरवर करडईची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे रब्बीत पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये हरभरा, करडई, गहू तसेच रब्बी ज्वारी पेरणीला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी पेरणीक्षेत्र एक लाख ५३ हजार ३७० हेक्टर असताना १५४.३९ टक्क्यांनुसार दोन लाख ३६ हजार ७९० हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीची २ लाख हेक्टरवर पेरणी

तर गव्हाचे सरासरी पेरणी क्षेत्र २९ हजार ७१३ हेक्टर असताना १३१.४३ टक्क्यांनुसार ३९ हजार ५३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तर ३२ हजार ६९९ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र असताना शेतकऱ्यांनी ५० हजार ७११ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. यासोबतच करडईचे सरासरी क्षेत्र २४६४ हेक्टर असताना ३९६.७९ टक्क्यांनुसार ९७७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बी ज्वारी, हरभऱ्याची १५ लाख हेक्टरवर पेरा

तर रब्बी मकाचे क्षेत्र ३८३८ हेक्टर क्षेत्र असताना २७४.५७ टक्क्यांनुसार १० हजार ५३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा बियाणे अनुदानावर वाटप केले. जिल्ह्यातील वाढते रब्बी पेरणी क्षेत्र लक्षात घेता कृषी विभागाच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांना सिंचनासाठी ठिबक व तुषारसंच घेण्यासाठी ८० टक्के अनुदान देण्यात येत असून, याचा थेट परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणी क्षेत्राच्या वाढीत दिसून येतो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.

रब्बीमधील पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हरभरा १,५३,३७० .२,३६,७९० १५४.३९

गहू २९,७१३ ३९,०५३ १३१.४३

रब्बी ज्वारी ३२,६९९ ५०,७११ १५५.०८

रब्बी मका ३८३८ १०,५३८ २७४.५७

करडई २४६४ ९,७७७ ३९६.७९

एकूण २,२४,६३४ ३,४८,८३५ १५५.२९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com