Jowar Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : रब्बी ज्वारीची ८ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदा सरासरी पाऊस पडलेला पाऊस यांच्यात तफावत आहे.परिणामी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या, अन्नधान्य व चारा यासाठी महत्त्व असल्यामुळे यंदा या दोन जिल्ह्यातील अनेक शेतकरी ज्वारीला पसंती देत आहेत.

चालू रब्बी हंगामात शुक्रवार (ता. ३) परभणी जिल्ह्यात ७ हजार ८१२ हेक्टर (६.९१ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १ हजार १६३ हेक्टर (९.९४ टक्के) अशी दोन जिल्ह्यात मिळून एकूण ८ हजार ९७५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यात एकूण रब्बीचा ३२ हजार ७९७ हेक्टरवर पेरा झाला आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर आहे. शुक्रवार (ता. ३) पर्यंत १३ हजार ९२० हेक्टरवर (५.१४) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ७ हजार ८१२ हेक्टरवर (६.९१ टक्के),गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १७८ हेक्टर (०.४५ टक्के) पेरणी झाली आहे.

हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी ५ हजार ८६४ हेक्टर (५.२३ टक्के) तर करडईची ३ हजार ३७१ पैकी ६५ हेक्टर (१.९३ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ हेक्टर आहे.

शुक्रवार (ता. ३) पर्यंत १८ हजार ८७७ हेक्टर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी १ हजार १६३ हेक्टर, गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २ हजार ९६२ हेक्टर पेरणी झाली. हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १४ हजार ६७० हेक्टर, करडईची २०५ पैकी ५३ हेक्टर (२५.७७ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी-हिंगोली जिल्हा ज्वारी पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवार,ता.३ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी २०००० ३४० १.७

जिंतूर १५४४६ १५५ १.००

सेलू १७४०७ .१७५४ १०.०८

मानवत ७५७१ ९५ १.२५

पाथरी ९६०४ १६६७ १७.३६

सोनपेठ ६८७६ १५० २.१८

गंगाखेड १७०७७ ३५५१ २०.७९

पालम २०१३० ०० ००

पूर्णा ८१७५ १०० १.२२

हिंगोली १५३४ ००० ०००

कळमनुरी ८३० ००० ०००

वसमत ६११२ ००० ०००

औंढा नागनाथ २५३१ ६५० २५.६८

सेनगाव ६८९ ५१३ ७४.४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT