Pune News : गेल्या आठ दिवसांपासून काही प्रमाणात थंडीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. पुणे विभागात अनेक ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत ज्वारीची सरासरीच्या सात लाख २० हजार २२७ हेक्टरपैकी २ लाख ८२ हजार ८१२ हेक्टर म्हणजेच ३९ टक्के पेरणी झाली आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी आहे. खरीप वाया गेल्याने आता शेतकऱ्यांना रब्बीकडून आशा आहे. त्यापाठोपाठ हरभरा, मका, गहू या पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. सध्या नगरमध्ये खरीप हंगामातील भात पीक फुटवे फुटण्याच्या तसेच पोटरी अवस्थेत आहे.
खरीप ज्वारी पीक कणसामध्ये दाणे भरण्याच्या ते हुरडा अवस्थेत आहे. अपुरे पर्जन्य व पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. रब्बीतील ज्वारी पीक, गहू व हरभरा पिके उगवण अवस्थेत आहेत. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील सोयाबीनची काढणी सुरू आहे. पावसाच्या खंडामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे पिवळा मोझॅक व मूळकुजच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटली. त्यामुळे उत्पादनात घट येत आहे. मका पीक काढणीच्या अवस्थेत आहे.
त्याच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. बाजरीची देखील हीच अवस्था आहे. तूर पीक वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत आहे. अपुऱ्या पावसाचा फटका या पिकालाही बसला आहे. पुणे जिल्ह्यात खरिपातील भात पीक निसवण्याच्या व दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे.
रब्बी ज्वारीची झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी
नगर २,६७,८३४ ८२,६११ ३१
पुणे १,३४,३३६ ५२,२१६ ३९
सोलापूर ३,१८,०५७ १,४७, ९८५ ४७
एकूण ७,२०,२२७ २,८२,८१२ ३९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.