Oil Seed Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Oil Seed Sowing : परभणी जिल्ह्यात रब्बीत गळीत धान्यांचा पेरा घटला

माणिक रासवे

Parbhani News : रब्बी हंगामात करडई, जवळ, तीळ, सूर्यफूल आदी मिळून एकूण गळीत धान्यांच्या पेरणी क्षेत्रात परभणी जिल्ह्यात घट झाली, तर हिंगोली जिल्ह्यात वाढ झाली आहे. शुक्रवार (ता. १८)पर्यंत परभणी जिल्ह्यात गळीत धान्यांची २ हजार ९१ हेक्टरवर (५७.३९ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात १ हजार ९२५ हेक्टरवर (२२८.३६ टक्के) पेरणी झाली आहे. करडईच्या क्षेत्रात काही तालुक्यांत वाढ झाली आहे, तर जवस, तीळ, सूर्यफुलाच्या क्षेत्राचा आलेख उतरता आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर असताना, शुक्रवार (ता.१८)पर्यंत २ लाख ८९ हजार ४०७ हेक्टरवर (१०६.८७ टक्के) पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी २ हजार ९१ हेक्टर (५७.३९ टक्के) पेरणी झाली असून, त्यात करडईची ३ हजार ३७१ पैकी २ हजार २३ हेक्टर (६०.०१ टक्के), जवसाची ११९ पैकी १७ हेक्टर (१४.२९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी ३१ हेक्टर (९२.१५ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी २ हेक्टर (७.६८ टक्के) पेरणी झाली आहे.

तृणधान्यांमध्ये रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी १ लाख ८ हजार ५८७ हेक्टरवर (९६.०२ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २६ हजार ४२९ हेक्टर (६७.२४ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी ९६४ हेक्टर (४६.२१ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांमध्ये हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० असताना १ लाख ५१ हजार ३१ हेक्टर (१३४.६४ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांतील करडईचे क्षेत्र वाढले आहे. परंतु जवस, तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख १० हजार ८१४ हेक्टर असताना शुक्रवार (ता. १८)पर्यंत २ लाख १० हजार ८१४ हेक्टर (११९.१८ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात गळीत धान्यांचे सरासरी क्षेत्र ८४२ हेक्टर असताना १ हजार ९२५ हेक्टर (२२८.३६ टक्के) पेरणी झाली आहे.

त्यात करडईचे सरासरी क्षेत्र २०५ हेक्टर असताना १ हजार ५७८ हेक्टर (७६७.२९ टक्के) पेरणी झाली. तिळाची १८.६६ पैकी ४९ हेक्टर (२६२.५९ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्यांमध्ये ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ हेक्टर असताना १६ हजार ८९९ हेक्टर (१४४.४७ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३४ हजार ४७३ हेक्टर (८१.१० टक्के), मक्याची ९७१ पैकी ६०९ हेक्टर (६२.७२ टक्के) पेरणी झाली.

कडधान्यांमध्ये हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ हेक्टर असताना १ लाख ५६ हजार ७५० हेक्टर (१३०.४६ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात करडईच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. तर जवस, तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे.

परभणी, हिंगोली जिल्हा गळीत धान्ये पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका...करडई...जवस...तीळ...सूर्यफूल..

परभणी...३५०...०००...०००...०००

जिंतूर...०००...०००...०००...०००

सेलू...३५१...२...७...०००

मानवत...२८८...५...४...०००

पाथरी...१३०...०००....०००...०००

सोनपेठ...४७.५...०००...०००...०००

गंगाखेड...१००...१०...२०...०००

पालम...५६६...०००...०००...२

पूर्णा...१९१...०००...०००...०००

हिंगोली...३९१...०००...०००...०००

कळमनुरी...६१३...०००...१०...३

वसमत...३५१...०००...३९...०००

औंढा नागनाथ...१००...०००...०००...०००

सेनगाव...१२३...०००...०००...०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT