Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : पावसाची दडी, वाढत्या वाऱ्यामुळे पिके संकटात

Monsoon Rain : यंदा पूर्वमोसमी पाऊस लवकर व चांगला पडला. पूर्वमोसमी पावसानंतर सुरवातीला मोसमी पाऊसही चांगला पडला. पण जून महिन्यात सरासरी इतकाही पाऊस पडला नाही.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात तीन लाख ४८ हजार ३४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ती सरासरीच्या १०३ टक्के आहे. लवकर पेरणी झालेल्या पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र, पावसाने मारलेली दडी व वाढत्या वाऱ्यामुळे ओल कमी होण्याची भीती असून पिके संकटात येण्याची चिन्हे आहेत.

यंदा पूर्वमोसमी पाऊस लवकर व चांगला पडला. पूर्वमोसमी पावसानंतर सुरवातीला मोसमी पाऊसही चांगला पडला. पण जून महिन्यात सरासरी इतकाही पाऊस पडला नाही. जून महिन्याचा सरासरी पाऊस १०२.५ मिलिमीटर असतो. परंतु यंदा जूनमध्ये सत्तर मिलिमीटरही पाऊस झाला नाही.

त्यामुळे यंदा पाच लाखाहून अधिक हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचा अंदाज फोल ठरला. पावसाअभावी खरीप पेरणीला ब्रेक लागला तरी पाऊस पडेल, या भरवशावर केलेल्या पेरणीमुळे जिल्ह्यात १०३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. पण पाऊस गायब झाला आहे. तर जुलै महिन्यात एक - दोन दिवस अत्यल्प पाऊस पडला असून त्याचे वितरणही असमान आहे.

लवकर पेरणी झालेल्या पिकांची उगवण चांगली आहे. पण एकीकडे गायब झालेला पाऊस व दुसरीकडे गेल्या तीन - चार दिवसांत वाढलेल्या वाऱ्याने ओल कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी खरीप पिके संकटात येण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारीही प्रति तास २० किलोमीटर वाऱ्याचा वेग

रविवारी (ता. ६) जिल्ह्यात वाऱ्याचा वेग प्रतितास २० किलोमीटर होता. सोमवारी (ता. ७) त्यात वाढ होऊन तो प्रतितास २१ किलोमीटरवर पोहोचला. तर मंगळवारीही (ता. ८) वाऱ्याचा वेग प्रतितास २० किलोमीटर होता.

या वाढत्या वाऱ्याने जमिनीतील ओल वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. अद्याप जमिनीत ओल आहे. मात्र, पावसाचा अभाव वाऱ्यामुळे तो कमी झाल्यास आंतरमशागतीलाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पिकांत वाढलेल्या तणाचा प्रश्‍नही गंभीर बनू शकतो.

जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीच्या ६५ टक्क्यांपर्यंत पाऊस पडला. कमी पाऊस पडला असताना आता वाऱ्याचा वेग वाढला आहे. असास वारा राहिल्यास जमिनीतील ओल कमी होणार आहे. पिकांसाठी आवश्‍यक पाण्याची गरज वाढणार आहे. जास्त दिवस अशीच स्थिती राहिल्यास पिकांचे नुकसान होणार आहे.
डॉ. लालासाहेब तांबडे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

Soybean Crop Disease Management: सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना

SCROLL FOR NEXT