Kharif Sowing Marathwada : मराठवाड्यात ४१ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season 2025 : पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीनची छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात खरिपाच्या सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रापैकी ४१ लाख ७२ हजार ८६४ हेक्टरवर म्हणजे सुमारे ८३.९१ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीनची छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली.

दुसरीकडे लातूर वगळता एकाही जिल्ह्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही. लातूर,धाराशिव या सोयाबीनच्या पट्ट्यात सोयाबीनची, तर कपाशी उत्पादक जिल्ह्यातच अजून कपाशीची लागवड झाली नाही हे विशेष.

यंदा मराठवाड्यात ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सहा लाख ८१ हजार ९०३ हेक्टर, जालन्यातील सहभागी काढून हजार १७३ हेक्टर, बीडमधील आठ हजार ९२५ हेक्टर, लातूरमध्ये पाच लाख ५४ हजार १६० हेक्टर, नांदेडमध्ये सात लाख ६१ हजार ५७६ हेक्टर परभणीतील पाच लाख १८ हजार ४००६८ हेक्टर हिंगोलीतील चार लाख दहा हजार ३९८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : मराठवाड्यात तुरीची ३ लाख ४३ हजार हेक्टर पेरणी

या सर्वसाधारण क्षेत्रापैकी सुमारे ४१ लाख ७२ हजार ८६४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरमधील ६ लाख ५ हजार ८२६ हेक्टर, जालन्यातील ५ लाख ७३ हजार ७१० हेक्टर, बीडमधील ६ लाख ५७ हजार ९०७ हेक्टर, लातूरमधील ५ लाख २३ हजार ८६३ हेक्टर, धाराशिवमधील ४ लाख ७३ हजार ९९३ हेक्टर, नांदेडमधील ६ लाख ३८ हजार २१२ हेक्टर, परभणीतील ३ लाख ७६ हजार २ हेक्टर तर हिंगोलीतील ३ लाख २३ हजार ३४९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

११ लाख ३० हजार हेक्टरवर कपाशी

मराठवाड्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १४ लाख १९ हजार ५३५ हेक्टर आहे. त्यातुलनेत प्रत्यक्षात ७६.४४ टक्के म्हणजे सुमारे ११ लाख ३० हजार ९४८ हेक्टर कपाशीची लागवड झाली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ३२३ हेक्टर, जालन्यातील २ लाख ६३ हजार २९७ हेक्टर, बीडमध्ये २ लाख २३ हजार ९ हेक्टर, नांदेडमध्ये १ लाख ७० हजार ६२४ हेक्टर, परभणीत १ लाख ५५ हजार ७०५ हेक्टर, लातूरमध्ये १२५६७ हेक्टर, धाराशिवमध्ये १५५ हेक्टर, तर हिंगोलीत लागवड झालेल्या ३४ हजार २६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing: सांगली जिल्ह्यात ७० टक्के पेरणी उरकली

बीडमध्ये सर्वांत कमी पाऊस

मराठवाड्याचे १ जून ते ७ जुलै पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान १७९.७५ मिलिमीटर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो सरासरी पावसाच्या तुलनेत ७३.६३ टक्के इतका आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०५.५९ टक्के, जालन्यात ८२.३१ टक्के, लातूरमध्ये ५३.२१ टक्के, धाराशिवमध्ये ७६.८२ टक्के,नांदेडमध्ये ९१.१२ टक्के, परभणीत ५५.६० टक्के, हिंगोलीत ८०.३३ टक्के तर बीड जिल्ह्यात सर्वांत कमी ४४.०८ टक्के पाऊस झाला आहे.

२१ लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीन

मराठवाड्यातील आठवी जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रतीक्षा ९३.३१ टक्के म्हणजे सुमारे २१ लाख ४४ हजार ४११ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये हिंगोलीतील २ लाख ३१ हजार ९४३ हेक्टर, परभणीतील १ लाख ९३ हजार १८० हेक्टर, नांदेडमधील ३ लाख ८२ हजार ८६६ हेक्टर, धाराशिवमधील ३ लाख ८६ हजार ६९९ हेक्टर, लातूरमध्ये ४ लाख २९ हजार ७८७ हेक्टर, बीडमधील ३ लाख २ हजार ६४५ हेक्टर, जालन्यातील १ लाख ९० हजार ११४ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगरमधील २७ हजार ८७६ हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीनचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com