Kharif Sowing : मराठवाड्यात तुरीची ३ लाख ४३ हजार हेक्टर पेरणी

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी करताना निखळ तूर लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र अनेक भागात पाहावयास मिळत आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण ४ लाख ४५ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७६.९७ टक्के म्हणजे तीन लाख ४३ हजार २९४.६० हेक्टरवर तुरीची लागवड व पेरणी झाली आहे.

पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण एक लाख ४१ हजार ३९७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एक लाख २६ हजार १५७ हेक्टर म्हणजे सुमारे ८९.२२ टक्के क्षेत्रासह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या पाच जिल्ह्यांतील सर्वसाधारण तीन लाख ४ हजार ५९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणी झालेल्या २ लाख १७ हजार १३६ हेक्टर म्हणजे सुमारे ७१.२९ टक्के क्षेत्रावरील पेरणी झालेल्या तुरीचा समावेश आहे.

Kharif Sowing
Jalna Kharif Sowing : जालन्यात पाच लाख हेक्टरवर खरीप पेरणी

यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी करताना निखळ तूर लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र अनेक भागात पाहावयास मिळत आहे.

हिंगोली, छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढे जाऊन पेरणी

जिल्ह्याच्या तूर पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढे जाऊन तुरीची पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२७.०४ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०७.४९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे.

इतर जिल्ह्याचा विचार करता जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८३.९८ टक्के, बीडमध्ये ७३.४१ टक्के, लातूरमध्ये ७०.४४ टक्के, धाराशिवमध्ये ५८.५६ टक्के, नांदेडमध्ये ७१.७६ टक्के तर परभणीत ५१.२३ टक्के क्षेत्रावरच तुरीची पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : अमरावती जिल्ह्यात खरीप पेरा ८२ टक्के क्षेत्रावर

जिल्हानिहाय तुरीचे सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण प्रत्यक्ष पेरणी

छ. संभाजीनगर ३११०९.७१ ३९५२०

जालना ५३६६३.८० ४५०६८

बीड ५६६२३.७१ ४१५६९

लातूर ९१७८६.२३ ६४६५७

धाराशिव ५५६०८.०६ ३२५६३

नांदेड ७०२२३.२० ५०३९०

परभणी ४२६०२.७८ ४१८२४

हिंगोली ४४३७८.१० ४७७०२.८०

विद्यापीठाच्या बियाण्यामुळे पाचशे खेड्यात पेरणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून मागील सात आठ वर्षापासून तूर सुधारित वाण या जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी खरिपात वेळेवर उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना या वाणाची पेरणी करता आली.

यापासून चांगले उत्पादन असल्याने या विद्यापीठ अंतर्गंत असलेले बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले कोरडवाहूसाठी बीडीएन ७११ आणि बागायती शेतीसाठी बीडीएन २०१३-४१ म्हणजे गोदावरी वाणाची पेरणी करण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा कल दिसून येत आहे.

चालू खरिपात गोदावरी या तूर वाणाची ६७० बॅग विक्री झाल्या पर्यंत आठ खरीप हंगामात विद्यापीठाने तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात तूर बियाणे उपलब्ध केल्याने जिल्ह्यातील पाचशे खेड्यात या वाणाचे शेतकरी बियाणे पेरणी करू शकले, अशी माहिती विभागीय कृषी विस्तार केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com