Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर कोल्हापुरात पेरणीला सुरुवात

Sowing Update : कोल्हापूर जिल्ह्यात कागल, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांत रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधत पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात कागल, करवीर, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांत रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधत पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शेतात आणि शेतकरी कुटुंबात खरिपाच्या पेरण्यांची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतीच रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्रानुसार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, याच मुहूर्तावर बळीराजाने पेरणीसाठी कुऱ्या हातात घेतल्या आहेत. जिल्ह्यात एक लाख ९० हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. चांगले आणि दर्जेदार वियाण्यांची निवड करून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात ३७ हजार ७७१ क्विंटल बियाण्यांची पेरणी केली जाणार आहे.

यामध्ये भात, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका, नाचणी, सोयाबीसह इतर कडधान्यांचा समावेश आहे. या सर्व बियाण्यांची खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावरही शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी वादळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. मात्र ऊस आणि पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करतात. तर, हातकणंगले तालुक्यात अद्याप शेतीच्या मशागतीची अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे किंवा स्वतःचे पाणी देता येते, अशा ठिकाणी पेरणीची धांदल उडाली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे. त्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात पावसाचे वातावरण चांगले वाटत आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतालाही चांगली घात आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्रावर पेरणी करण्याचा यंदा चांगला योग आला आहे.
यशवंत पाटील, शेतकरी, बामणी, ता. कागल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का?

Maharashtra Governor: आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल

Agriculture Investment : शेतीसाठीची गुंतवणूक आणि निविष्ठा अनुदान

Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट

Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल

SCROLL FOR NEXT