Pre-Sowing Tillage
Pre-Sowing Tillage Agrowon

Pre-Sowing Tillage : मोखाड्यात पेरणीपूर्व मशागत सुरू

Agriculture Update : पावसाळा तोंडावर असल्याने राब भाजणी, शेताची बांधबंदिस्ती आणि मशागत, शेतीचे अवजारे गोळा करण्याची लगबग शेतकरी वर्गाची सुरू झाली आहे.
Published on

Mumbai News : मोखाडा तालुक्यात दीड-दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. २० मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. प्रचाराच्या रणधुमाळीत मात्र सामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजूरही ओढले गेले होते.

आता या तणावातून मुक्त होत शेतकरी आणि शेतमजूर आगामी खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीला लागले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने राब भाजणी, शेताची बांधबंदिस्ती आणि मशागत, शेतीचे अवजारे गोळा करण्याची लगबग शेतकरी वर्गाची सुरू झाली आहे.

Pre-Sowing Tillage
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राची उपयुक्तता

मोखाडा तालुक्यात खरीप हंगामाची शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. तालुक्यात कुठलीही कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. खरीप हंगामाच्या शेतीच्या उत्पन्नावर येथील शेतकऱ्यांना वर्षभराची गुजराण करावी लागते. खरीप हंगाम संपताच शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत होतात.

त्यामुळे आपल्या वर्षभराच्या शिदोरीसाठी खरीप हंगामाच्या उत्पादनासाठी जास्तीत जास्त मेहनत त्यांना करावी लागते. तालुक्यात भात, नागली आणि वरई ही तीन मुख्य नगदी पिके घेतली जातात. या व्यतिरिक्त तूर, उडीद, खुरासणी, कुळीद ही दुय्यम पिकेही घेतली जातात.

Pre-Sowing Tillage
Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

तालुक्यात १३ हजार हेक्टरहून अधिक खरिपाचे क्षेत्र आहे. यामध्ये वरईचे चार हजारांहून अधिक, नागलीचे तीन हजार, तर भाताचे अडीच हजार हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित क्षेत्र इतर पिकांचे आहे. प्रति वर्षी या क्षेत्राची मशागत, पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असते. यंदा पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात लोकसभा निवडणूक होऊ घातली. त्यामुळे पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शेतकरी व शेतमजूर या निवडणुकीत ओढला गेला होता. परिणामी, खरीप हंगामपूर्व शेतीची कामे रखडली गेली.

खरिपाचे घेतले जाणारे पीक (हेक्टरमध्ये)

वरई ४०००

नागली ३०००

भात २५००

इतर पीक ३५००

निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे मजूर मिळत नव्हते. परिणामी, खरीपाच्या मशागतीचे कामे खोळंबली होती. मतदान झाल्यानंतर लगेचच मजूर घेऊन रखडलेली कामे सुरू केली आहेत. सर्व शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पन्न किती होईल, याची अनिश्चितता आहे. मात्र, पारंपरिक व्यवसाय आणि अन्य उत्पन्नाची सोय नसल्याने शेतीच करावी लागत आहे.
उमाकांत हमरे, शेतकरी, खोडाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com