Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : गेवराईत ६० टक्के पेरा; यंदा कपाशीला प्राधान्य

Sowing Update : आतापर्यंत जवळपास ६० टक्के पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक कपाशीला गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मका, उडीद याचा पेरा घटलेला आहे.

Team Agrowon

Gevrai News : गतवर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यास यंदा जास्त ताटकळत न ठेवता मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने पेरते केले. आतापर्यंत जवळपास ६० टक्के पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक कपाशीला गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मका, उडीद याचा पेरा घटलेला आहे.

सलग तीन खरीप पीके अतिवृष्टीत सापडल्याने गेवराई तालुक्यातील शेतकरी होरपळून निघाला. यंदा खरिपपूर्व शेतमशागत रखरखीत उन्हात करणाऱ्या शेतकऱ्यांना वरूणराजाने यंदा जास्त ताटकळत न ठेवता मृग नक्षत्राच्या प्रारंभीच दिलासा दिला. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरता झाला. तालुक्यात १३ महसूल मंडळांतर्गत भौगोलिक १ लाख ४६ हेक्टर क्षेत्र आहे.

यामध्ये पेरणीयोग्य १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाच्या अहवालानुसार (ता.१८) खरिपाची ७० टक्के पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक कापूस लागवड करण्यात आलेली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी तुरीच्या पेऱ्यातही वाढ झालेली आहे. दरम्यान, आतापर्यंत सर्वाधिक सिरसदेवी महसूल मंडळात पेरणी झाली असून, रेवकी मंडळात पेरणी कमी झाली आहे.

या वर्षी पेरणीस पोषक असलेल्या मृग नक्षत्रात योग्य पाऊस झाला. मागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने उजवा कालवा आणि गोदावरी नदीच्या शिवारात उन्हाळी बाजरी झाली नाही. परिणामी बाजरीच्या क्षेत्रात वाढ होईल.
अश्विनी मस्के, मंडळ कृषी अधिकारी, जातेगाव
मादळमोही मंडळात आतापर्यंत खरिपाची ५० टक्के पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक साडेचार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आलेली आहे. या मंडळात बाजरी, तुरीचा पेराही वाढणार आहे.
राजेंद्र सांगळे, मंडळ कृषी अधिकारी, मादळमोही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT