APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC : सोलापूर जिल्ह्यात होणार दक्षिण सोलापूरला स्वतंत्र बाजार समिती

News APMC Market : राज्य शासनाच्या एक तालुका, एक बाजार समिती या धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्य शासनाच्या एक तालुका, एक बाजार समिती या धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात स्वतंत्र बाजार समितीची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने नव्याने ६५ बाजार समित्या घोषित केल्या आहेत.

त्यात सोलापूर जिल्ह्यातून दक्षिण सोलापूरची एकमेव निवड करण्यात आली आहे. राज्यात सध्या ३०५ बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार आहेत. त्यात आता नव्याने आणखी ६५ तालुक्यात बाजार समित्या निर्मिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही याबाबतचे सादरीकरण झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावेळीही बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली होती.

या निर्णयामुळे सोलापूर बाजार समितीचे विभाजन होणार असून, सध्या या बाजार समितीत उत्तर सोलापुरातील ३८ आणि दक्षिण सोलापुरातील ९० गावे समाविष्ट आहेत.

या बाजार समितीमुळे दक्षिण सोलापूरसाठी स्वतंत्र बाजार समितीसाठी आणि त्याच्या विकासासाठी १० ते १५ एकर जागा लागणार आहे. लवकरच या संबंधीची पुढील कार्यवाही होईल, असे पणन विभागाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT