Ahilyanagar News: अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढत आहे, मात्र दरात सुधारणा होत नसल्याची बाजारातील स्थिती आहे. अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीची कमी-जास्त आवक होत आहे.
सध्या २ हजार ते ३ हजार ३०० व सरासरी २६५० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. शुक्रवारी (ता.२५) ६८ क्विंटल ज्वारीची आवक झाली. याला किमान २३००, तर कमाल ३६०० आणि सरासरी २९५० रुपयांचा दर मिळाला.
ज्वारी उत्पादनात अहिल्यानगर, धाराशिव, बीड, सोलापूरसह काही जिल्हे आघाडीवर असतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत भागात सेंद्रिय पद्धतीने ज्वारी पिकविलेल्या ज्वारीला मागणी अधिक असते.
अहिल्यानगर येथील बाजार समितीत अहिल्यानगरसह मराठवाडा, सोलापूर या भागांतून ज्वारी विक्रीला येते. येथे सध्या ५० क्विंटलपासून ३०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या गावरान ज्वारीला २ हजार ते ३ हजार ३०० व सरासरी २६५० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २४) ७६ क्विंटलची आवक झाली, दर २३५० ते ३३५० व सरासरी २८५० रुपये मिळाला.
बुधवारी (ता. २३) ३१२ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ३०० व सरासरी २६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंगळवारी (ता. २२) ६६ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ३ हजार ३०० व सरासरी २६५० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी (ता. २१) १८ क्विंटल आवक होऊन २ हजार ते ३१०० व सरासरी २५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
शनिवारी (ता. १९) १७२ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० व सरासरी २६५० रुपयांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाही. बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.