Dharashiv News: उन्हाचा कडका वाढलेल्या असताना शेतकऱ्यांकडील विहिरी व विंधनविहिरींचे पाणी कमी होऊन रब्बी पिकांच्या सिंचनासाठी अडचणी येत आहेत. यंदा मांजरा धरण शंभर टक्के भरलेले असतानाही उजव्या कालव्यातून पाणी न सोडल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी हंगामातील उभी पिके पाण्याअभावी करपत असून शेतकऱ्यांच्या कष्टांचे मोल वाया जाण्याची भीती आहे. .शेतकऱ्यांच्या परिस्थितीची दखल घेऊन उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी गुरुवारी (ता. ५) सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कालवा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली. त्यानंतर मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून तातडीने पाणी सोडण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले..MLA Kailas Patil Dharashiv: पीकविमा योजनेत राज्य सरकारने बदल का केले?.यामुळे काही दिवसापासून पाण्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसंपदा विभागाने डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे. मात्र, उजव्या कालव्यातून अद्याप पाणी न सोडल्यामुळे कळंब तालुक्यातील व कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे..MLA Kailas Patil : धाराशिव जिल्ह्यातील बिबट्या आणि वाघ जेरबंद करण्याची कैलास पाटील यांची मागणी; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण.पाण्याअभावी उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आपल्या कष्टाने पिकवलेल्या पिकांकडे असहाय नजरेने पाहत आहेत. वेळेवर पाणी न मिळाल्यास वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल जपण्यासाठी आणि उभ्या पिकांना जीवनदान देण्यासाठी पाण्याची गरज मंत्री भोसले यांच्या निदर्शनास आणून देत मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन तत्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. .त्यानंतर भोसले यांनी अधिकाऱ्यांना कॉल करून उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्याबाबत आदेश दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. यामुळे लवकरच उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.