Someshwarnagar News: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस लागवड हंगाम सन २०२५-२६ साठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. बोगस ऊस नोंद केल्यास ५०० रुपये ऊस बिलातून वसूल करण्यात येणार आहेत. तसेच हार्वेस्टर तोडणीसाठी विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला आहे.
आडसाली लागवड हंगाम १ जुलैपासून सुरू होणार आहे. पूर्वहंगामी सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, सुरू हंगाम १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान होईल. यासंदर्भात सोमेश्वर कारखान्याने प्रसिद्धिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. दोन जुलै ते ३ जुलै दरम्यान लागवड नोंदी बंद राहतील. ४ ते १४ जुलै दरम्यान लागवड नोंदी ज्या त्या तारखेस घेण्यात येतील.
१५ जुलैपर्यंत नोंदी अधिक आल्यास ड्रॉ काढण्यात येणार आहे. आडसाली हंगामासाठी को ८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५ या ऊसजातींसाठी १ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान परवानगी दिली आहे. पूर्वहंगामी ऊस लागणीसाठी को-८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, व्हीएसआय १०००१, फुले १५०१२, फुले १३००७, व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींसाठी १ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान परवानगी दिली आहे.
सुरू हंगामासाठी एमएस १०००१, को-८६०३२, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय ९८०५, फुले १५०१२, फुले १३००७, कोएम ०२६५ या ऊसजातींसाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान परवानगी दिली आहे. सभासदांनी एकूण लागवड क्षेत्रापैकी आडसाली ४० टक्के, पूर्वहंगामी १५ टक्के, सुरू १० टक्के व खोडवा ३५ टक्के या प्रमाणात लागवड करण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने केले आहे.
‘नोंदीचा ऊस इतर कारखान्यास देऊ नका’
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, की हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी प्राधान्य दिले आहे. सभासदांनी शेतात किमान साडेचार फूट अंतर ठेवून ऊस लागवड करावी. सोमेश्वर कारखाना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत असून, हार्वेस्टरद्वारे तोडणी झाल्यास प्रति टन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतर कारखान्यास संमतीशिवाय देऊ नये. अन्यथा त्यांना साखर, ऊस रोपे, बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.