Mumbai News : राज्यातील शेतकऱ्यांना सौरउर्जा पंपाद्वारे शेतीला पाणी मिळावे यासाठी ३ लाख १२ हजार सौर पंप बसविले आहेत. आगामी पाच वर्षांत १० लाख सौर पंप बसविण्यात येतील, अशी माहिती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात दिली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी अभिभाषणात कृषी योजनांचा आढावा घेतला.
राज्यपाल म्हणाले, ‘‘राज्य शासन कृषी क्षेत्रातील संधीचा विस्तार करून शेतकरी हितास प्राधान्य देणारे निर्णय घेत आहे. राज्यामध्ये सौरऊर्जा पंपांद्वारे शेतीकरिता पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता ‘मागेल त्याला सौर पंप योजना’ या अंतर्गत, ३ लाख १२ हजार सौर पंप बसविले आहेत. या योजनेअंतर्गत, पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना १० लाख सौर पंप पुरविण्यात येतील.
पंतप्रधान-कुसुम व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या अंतर्गत राज्यातील सर्व कृषी वाहिन्या सौरऊर्जाकृत करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचे लक्ष्य महाराष्ट्राने ठेवले आहे. राज्याने केवळ नऊ महिन्यांच्या विक्रमी वेळेत १४७ मेगावॅट एकत्रित सौरऊर्जा क्षमतेच्या एकूण ११९ वाहिन्या कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक साह्य मिळावे यासाठी २०२४-२५ या वित्तीय वर्षात ७४ हजार ७८१ कोटी रुपये इतके पीककर्ज वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५५ हजार ३३४ कोटी रुपये इतके कर्ज वितरित करण्यात आले आहे.
१२७४ घनमीटर गाळ काढला
चालू वर्षात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत १२७४ जलाशयांमधून सुमारे चार कोटी घनमीटर गाळ काढला आहे. हा गाळ ९५ हजार एकर जमिनीवर पसरविण्यात आला आहे, त्याचा ३१ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ‘किमान आधारभूत किंमत योजना’ या अंतर्गत, २०२४-२५ या हंगामात ५६२ खरेदी केंद्रांमार्फत ११ लाख २१ हजार ३८५ टन सोयाबीनची खरेदी केली आहे. खरीप विपणन हंगाम २०२४-२५ मध्ये, सात लाख टनांपेक्षा अधिक धान आणि १७१ टनांपेक्षा अधिक भरड धान्य खरेदी केले आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासाठी ‘मुख्यमंत्री एक तालुका एक बाजार समिती योजना’ राबविण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.