Assembly Monsoon Session 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Agri Pump: कृषिपंपांचे सौर ऊर्जाकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

Maharashtra Assembly Session: राज्यात कृषिपंपांचे सौर ऊर्जाकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे २३ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. डिसेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व पंपांचे सौर ऊर्जाकरण करण्यात येईल.

Team Agrowon

Mumbai News : राज्यात कृषिपंपांचे सौर ऊर्जाकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे २३ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. डिसेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व पंपांचे सौर ऊर्जाकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १८) दिली. विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

विधानसभा आमदार, मंत्री, इथल्या कर्मचाऱ्यांची नसून ती राज्यातील १४ कोटी जनतेची आहे. एक आमदार चुकीचा वागतो तेव्हा सगळ्या आमदारांबद्दल लोक तेच मत तयार करतात. आमदार सत्तेचा गैरवापर करतो असे लोकांचे मत होते. या घटनेमुळे आपली चुकीची छबी लोकांसमोर गेल्याची खंतही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, की कृषी वीज पंप ग्राहकांना गतवर्षी १८ हजार ८९२ कोटी रुपये अनुदानापोटी दिले आहेत. दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेसाठी मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना २ आणली. ही जगातील मोठी योजना आहे. १६ हजार मेगावॅट मागणी आहे.

‘ना हनी, ना ट्रॅप’

कुठला हनीट्रॅप आणला? नाना पटोले यांनी म्हणे बॉम्ब आणला. मात्र तो बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे दिला पाहिजे, असे सांगत ना ‘हनी आहे ना ट्रॅप’, ट्रॅपसंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र या संदर्भात माहोल असा तयार होत आहे की आजी-माजी मंत्री सगळे एकमेकांकडे पाहू लागले आहेत, असे सांगत कुठल्याही आजी-माजी मंत्र्यांचे हनीट्रॅप नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात एका महिलेची तक्रार होती, ती तिने मागेही घेतल्याचे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्तीचा आपण वारंवार उल्लेख करताय तो काँग्रेस पक्षाचा माणूस आहे. विरोधकांनी नीट पुरावे आणायचे, ते जोरदार मांडायचे, सत्तारूढ पक्षाची बोलती बंद करायची असते, पण साप साप म्हणून भुई धोपटायची हे योग्य नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

दरवाढ न करता सर्व लोकलला एसी डबे

उपनगरीय रेल्वेच्या डब्यांना बंद होणारे दरवाजे नसल्याने दुर्घटना होतात. मेट्रो जशी पूर्णपणे एसी असते आणि त्याचे दरवाजे बंद होतात, तसे नवे डबे उपनगरीय लोकलला असावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी मान्य केले असून लवकरच ते या संदर्भातील अधिकृत घोषणा करतील.

मात्र डबे जरी एसी असले तरी तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही. तसेच मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र, असे भाषण चार महिन्यानंतर सुरू होईल. त्यामुळे मी आताच सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, आजा आला तरीही हजारो पिढ्या मुंबई ही महाराष्ट्राची राहील. महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील, अशी ग्वाही देत फडणवीस यांनी उद्धवसेनेवर निशाणा साधला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Onion Procurement Scam : कांदा खरेदी केंद्रांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Maharashtra Assembly Session : बोजाखाली दबलेल्या सरकारची सुटका

MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT