Agriculture Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Agriculture Pump : सौर पंप एजन्सीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

Solar Pump Scheme : शासनाने सुरू केलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळत आहेत. उर्वरित ९५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते.

Team Agrowon

Pune News : शिरूर तालुक्यात शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. वीज टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप मिळत आहे. मात्र, या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या सौर पंप एजन्सीकडून शेतकऱ्याला सौर वाहतूक, खड्डा खोदणे, सिमेंट तसेच संच बसविण्याचा खर्च घेऊन पिळवणूक केली जात आहे.

शासनाने सुरू केलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळत आहेत. उर्वरित ९५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. ही योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी आणि महावितरण यांच्या माध्यमातून राबवली जात आहे.

योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तीन एचपी ते ७.५ एचपी क्षमतेचे पंप यामध्ये देण्यात येतात. विशेषतः ज्या भागांमध्ये नियमित वीज उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सौर पंप बसवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत बाराशे सौर पंप बसविले. चार हजार पाचशे पंप मंजूर आहेत, तसेच आठ हजार पाचशे अर्ज नवीन मंजुरीसाठी आलेले असल्याचे उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांनी सांगितले.

या बाबत एजन्सीच्या अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही फोन घेतला जात नाही. या बाबत बारामती येथील महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली असून , याबाबत उपकार्यकारी अभियंता भाग्यवंत यांनी सांगितले की याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

मी सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक आहे. सौर पंपासाठी अर्ज केला, रोटोमॅग कंपनीच्या सौर पंपासाठी पैसेही भरले. एजन्सीने मला स्वतःच्या वाहनाने साहित्य फाकटे येथून घेऊन जायला सांगितले. तसेच खड्डा करायला व इतर साहित्यदेखील आम्हालाच आणायला सांगितले आहे. काम करण्यासाठी फोन केला तर फोन घेतला जात नाही. महिना उलटून गेला तरी सुद्धा अद्याप काम करून दिले नाही.
- महादू मुसळे, म्हसे, ता. शिरूर
सौर पंप एजन्सी निवडल्यानंतर त्यांनी सर्व काम पूर्ण स्वतः करून सौर पंप चालू करून देणे आवश्यक आहे. मात्र, सौर पंप एजन्सी शेतकऱ्याची अडवणूक करीत त्यांना साहित्य वाहतूक तसेच खड्डा घेणे सिमेंट व खडी हे कामे करायला लावत आहे. त्याशिवाय बसवण्याची पैसेही घेतले जात आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करू. अशा एजन्सी शासनाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी.
- राजेंद्र गावडे, माजी संचालक, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती
सौर पंप मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खड्डे खोदणे, वाहतूक करणे सिमेंट आणणे ही कामे करायची नाही. ही कामे करण्याची जबाबदारी एजन्सीची आहे. अशाप्रकारे कामे करून शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले जात असल्यास याबाबत जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करावी. काही एजन्सीबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला जाईल.
- सुमीत जाधव, उपकार्यकारी अभियंता, शिरूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

Agriculture Warehouse : गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रासाठी सेवा पुरवठादार

Indian Agriculture Crisis : ...तरच भारताचा धाक निर्माण होईल

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळवला 

Ins-US Trade : डोनाल्ड ट्रम्प यांची दंडेलशाही

SCROLL FOR NEXT