Weather Forecasting Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Weather : सोलापूर शहरात वाऱ्याचा वेग २० किमी प्रतितास

Monsoon Update : सोलापूर शहरात साधारणत: प्रतितास ४ किलोमीटर वेगाने वारे वाहते. शहरात आज दिवसभरात सरासरी १० किलो मिटर प्रतितास या वेगाने वारे वाहिले आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर शहरात साधारणत: प्रतितास ४ किलोमीटर वेगाने वारे वाहते. शहरात आज दिवसभरात सरासरी १० किलो मिटर प्रतितास या वेगाने वारे वाहिले आहे. तर दुपारी २.३० च्या सुमारास वाऱ्याच्या वेगात वाढ होऊन प्रतितास २० किलोमीटर झाला. हा वाऱ्याचा वेग सरासरी अडीच पटीने वाढला आहे. याची नोंद सोलापूर हवामान विभागाकडे झाली आहे.

आषाढ महिना सुरू झाल्यापासून (२५ जून) सोलापुरातील पाऊस गायब झाला असून वाऱ्याचा वेग वाढला आहे. सोलापुरात १ ते ५ जुलै दरम्यान वाऱ्याचा वेग प्रतितास ५ ते ६ किलो मिटर एवढा राहिला आहे. नेहमीच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग अधिक होता. एकीकडे वाऱ्याचा वेग वाढला आहे तर दुसरीकडे कमाल तापमानाचा पारा आणि आर्द्रताही वाढल्याने ऐन पावसाळ्यात घाम फुटू लागला आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यातील तिसरे पुनर्वसू नक्षत्र सध्या सुरू आहे. मृग आणि आर्द्रा नक्षत्रातील पावसाने सोलापूरची निराशा केल्यानंतर आता तिसऱ्या नक्षत्रातही तसाच अनुभव येऊ लागला आहे.जून महिन्यात सोलापुरात सरासरी १०२.५ मिली मीटर पाऊस होतो. यंदा जूनमध्ये ६५ मिली मीटर (६३.४ टक्के) पाऊस एवढाच पाऊस झाला आहे.

जुलैमध्ये सोलापुरात सरासरी ९४.८ मिली मीटर पाऊस होतो. आतापर्यंत जुलैमध्ये फक्त ६.३ मिली मीटर (सरासरीच्या ६.६ टक्के) पाऊस झाला आहे. ढग येतात परंतु वाऱ्याचा वेग वाढल्याने डोळ्यासमोरून हे ढग निघून जातात, असाच काहीसा अनुभव आता रोज येऊ लागला आहे. शहरात सध्या संमिश्र वातावरण झाले आहे.

वाऱ्याचा वेग वाढल्याने घराबाहेर उकाडा कमी जाणवत असून तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. आज कमाल तापमानात वाढ झाली असून सोलापुरात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर शहर व परिसरात ११ जुलैपर्यंत अशीच स्थिती राहील. त्यानंतर पाऊस हजेरी लावण्यास सुरवात करेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जुलैमधील वातावरण

ता. १ : तापमान : ३२ अं. से. आद्रर्ता : ९० टक्के

ता. २ : तापमान : ३० अं. से. आद्रर्ता : ८१ टक्के

ता. ३ : तापमान : ३१.३ अं. से. आद्रर्ता : ८६ टक्के

ता. ४ : तापमान : ३१.७ अं. से. आद्रर्ता : ७८ टक्के

ता. ५ : तापमान : ३१.९ अं. से. आद्रर्ता : ८० टक्के

ता. ६ : तापमान : ३३.७ अं. से. आद्रर्ता : ६८ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bribery Case: दीड लाखाची लाच घेताना भूकरमापकाला अटक

Grampanchayat Officer Arrest: पंधरा हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी अटक

Devendra Fadnavis: ९२ टक्के पूरग्रस्तांना मदत देण्यात यशस्वी

Maize Armyworm: खानदेशात मका पिकात लष्करी अळीचे संकट

Maharshtra Politics: सत्तेची मुजोरी चढल्याने सरकारची चर्चेकडे पाठ

SCROLL FOR NEXT