
Agriculture Weather Forecast: आजपासून मंगळवारपर्यंत (ता. ६ ते ८) महाराष्ट्राच्या उत्तरेस १००४ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. या काळात हलक्या पावसाची शक्यता राहील. बुधवार ते शनिवार (ता.९ ते १२) या चार दिवसांत महाराष्ट्राचे उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच पावसाच्या प्रमाणात वाढ होईल आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल.
मात्र हा संपूर्ण आठवडाभर कोकणातील सर्वच जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकणात प्रतिदिनी ४० ते ६० मिमी पावसाची शक्यता राहील. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत ६ ते १४ मिमी, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत १ ते ८ मिमी, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ७ ते २० मिमी व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत २ ते १५ मिमी पावसाची शक्यता राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २५ किमी राहील. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २८ किमी राहील. मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेग २५ ते ३० किमी राहील. जेव्हा वाऱ्याचा ताशी वेग वाढतो, तेव्हा बाष्पीभवनाचा वेगही वाढतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो.
हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. तसेच प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २१ अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे तेथे हवेचे दाब अधिक राहतील. त्यामुळे संपूर्ण बाष्प भारताच्या दिशेने येऊन पावसाची शक्यता निर्माण होईल. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अधिक राहील. खरीप पिकांचे वाढीसाठी हे हवामान अनुकूल राहील. हवामान दमट व ढगाळ राहील.
कोकण
आज (ता. ६) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४४ ते ५४ मिमी, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ ते ५० मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे जिल्ह्यात ताशी १५ किमी, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ताशी १७ ते १९ किमी आणि पालघर जिल्ह्यात ताशी २१ किमी राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस,
तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८७ ते ८८ टक्के राहील. मात्र रायगड व ठाणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ८० ते ८३ टक्के राहील.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.६) नाशिक व धुळे जिल्ह्यांत ६ ते ८ मिमी, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत १० ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात ताशी २१ किमी, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ताशी २७ ते २८ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व जळगाव जिल्ह्यांत ८० टक्के, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ८६ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७५ टक्के राहील.
मराठवाडा
आज (ता.६) धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत १ मिमी इतक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभरात बराच काळ उघडीप आणि अत्यल्प पावसाची शक्यता आहे. तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आज ३ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी २४ किमी, नांदेड जिल्ह्यात ताशी २५ किमी, तर हिंगोली आणि जालना जिल्ह्यांत ताशी २६ किमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग परभणी जिल्ह्यात ताशी २७ किमी, लातूर जिल्ह्यात ताशी २९ किमी, तर बीड व धाराशिव जिल्ह्यात ताशी ३० किमी राहील.
एकूणच या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग अधिक राहील. कमाल तापमान धाराशिव व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. लातूर व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६० टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
आज बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ७ ते ९ मिमी, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत १३ ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ताशी २२ किमी, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ताशी २४ किमी राहील. कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७३ टक्के राहील.
मध्य विदर्भ
आज यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २ ते ७ मिमी, तर नागपूर जिल्ह्यात १५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात २२ किमी आणि वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत २५ ते २६ किमी राहील. कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ७१ ते ७६ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ८० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ६० टक्के राहील.
पूर्व विदर्भ
आज चंद्रपूर जिल्ह्यात ९ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात ११ मिमी, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत १८ ते २० मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत ताशी १५ ते १७ किमी राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत ८८ ते ९० टक्के, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ८० ते ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ६० ते ७० टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत २ ते ४ मिमी, तर सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत १२ ते १५ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ७३ ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७० ते ८४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी २२ ते ३० किमी इतका अधिक राहील.
कृषी सल्ला
पेरणी केलेल्या ठिकाणी दाट उगवण झाली असेल तर विरळणी करावी.
खरीप पिकांच्या लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे करून पीक तणविरहीत ठेवावे.
लागवडीयोग्य झालेली भात रोपांच्या पुर्नलागवडीची कामे सुरु करावीत.
नवीन लागवड केलेल्या आंबा, काजू, नारळ, सुपारी कलमांच्या क्षेत्रातून अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
पावसाळ्यात शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पशुवैद्यकीच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.