Nagpur News: विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसणे, राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शेतीमालास नसलेला भाव या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडत हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. सरकारला सत्तेची मुजोरी चढल्याने त्यांना चर्चा करण्यात रस नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला..विधानभवन येथे झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली..Maharashtra Politics: 'महायुती'त प्रवेशबंदीवर एकमत, अंतर्गत वाद निवळण्याचे संकेत.त्या वेळी बोलताना शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष वेधत वडेट्टीवार म्हणाले, की राज्यात २०२४ मध्ये २६०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या सत्तेतील तिघेही भांडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्याच्या उत्पन्नापैकी २२ टक्के हिस्सा कर्जावरील व्याज फेडण्यात जातो. राजकोषीय तूट वाढली आहे. २५ टक्के खर्च हा कमिनशवरील आहे. राज्य पूर्णपणे दिवाळखोरीत निघाले आहे..विरोधी पक्षनेतेपदे रिक्त ठेवण्यात आल्याबद्दल नापसंती व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची पदे रिक्त आहेत. ही दोन्ही संवैधानिक पदे आहेत. ही पदे रिक्त ठेवून सरकारने आपला संविधानावर विश्वास नसल्याचे दाखवून दिले आहे..Maharashtra Politics: निवडणूक आयोग इतके दिवस झोपला होता का? .म्हणून आम्ही चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. १९८० मध्ये भाजपकडे १४, तर १९८५ मध्ये १६ आमदार होते. तरीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. यावेळी सरकारला हे पद द्यायचे नाही. सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. पदे रिक्त ठेवून चहापानाला आमंत्रित करणे अयोग्य आहे..बहुमतापेक्षा सरकारची पापे मोठी : जाधवभास्कर जाधव म्हणाले, ‘‘सरकारकडे पाशवी बहुमत आहे, तरीही सरकार चर्चा करायला घाबरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बहुमतापेक्षा सरकारची पापे मोठी आहेत. हे सरकार पाशवी बहुमतामुळे बेमुर्वत झाले आहे. भ्रष्टाचार करण्यात कुणाचा नंबर पहिला, याची चढाओढ लागली आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.