Solapur Airport  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Airport : अखेर सोलापूरच्या विमानसेवेला प्रारंभ

Solapur-Goa Flight : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होणार होता. परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उड्डाण करू शकले नाही.

Team Agrowon

Solapur News : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे. या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी (ता. ९) सकाळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमानाला हिरवा झेंडा दाखवून झाला.

गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले. हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले, याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्या विमानाचे स्वागत केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होणार होता. परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उड्डाण करू शकले नाही.

पण केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते, आमदार राजू खरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील, शहाजी पवार, अमोल शिंदे त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर विमान सेवा सुरू झाल्याने उपस्थित सोलापूरकर भावुक झाले.

गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम स्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचे वाटप करण्यात आले.

सोलापूर हे आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे

यावेळी बोलताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर हे आध्यात्मिक पर्यटनाचं महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट ही महत्त्वाची देवस्थाने सोलापूर जिल्ह्यात आहेत.

आज या विमानसेवेमुळे सोलापूर हे देशाशी जोडले गेले आहे. सोलापूरचा समावेश उडान योजनेत केला गेला असल्याने भविष्यात तिरुपती बालाजी, मुंबई, बंगळूर, चेन्नई या शहरांनाही सोलापूर जोडले जाणार आहे. आध्यात्मिक पर्यटनासह शेती क्षेत्राला ही मोठा फायदा या विमानसेवेमुळे होणार आहे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT