Purandar Airport Protest : पुरंदरच्या हिंसक घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शांतता

Farmers Protest : मागील दोन दिवसांत शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दिवसभरात पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता.
Purandar Airport Protest
Purandar Airport ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुरंदर तालुक्यातील पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्व्हेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी शांततेत चाललेल्या आंदोलनाला पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे शनिवारी (ता. ३) हिंसकतेचे गालबोट लागले.

मागील दोन दिवसांत शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दिवसभरात पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मात्र, शांतता होती. सर्व्हेक्षण रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यात बैलगाड्या सोडल्या होत्या.

Purandar Airport Protest
Land Acquisition Bill: भूसंपादन मोबदला विलंब व्याजात कपातीचे विधेयक आणणार

सर्व्हेक्षणाच्या गाड्या सोडवून घेत असताना बैलास हुसकावण्याच्या निमित्तावरून पोलिस व आंदोलकामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावरून महिला, मुले व वयस्कर आंदोलकांवर लाठीमार झाल्याने आंदोलक संतप्त झाले, जोरदार घोषणाबाजी केली.

Purandar Airport Protest
Land Acquisition Compensation : भूसंपादन मोबदल्यावरील व्याजदरात कपात

या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित पोलिसांनी अांदोलकांवर लाठीमार केला. यात सुमारे ५० पेक्षा जास्तजण किरकोळ जखमी तर तिघेजण जबर जखमी झाले. पोलिसांनी जमावाला पांगावण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

यावेळी ६ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका त्यांना सोडून द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

रस्त्यात बैलगाड्या सोडून व लोखंडी खांब आडवे टाकून रस्ते रोखण्यात आले होते. सर्व्हेक्षण करणार नाही रस्त्याने जातो असे सांगितले होते. उन्हात रस्त्यात झोपलेल्या महिला आंदोलकांना मदत करून बाजूला केले. अशी क्रिया पोलिसांकडून झाली आहे. कोणाच्याही क्षेत्रात जाऊन पोलिसांनी कारवाई केली नाही.
- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com