Amravati Airport Inauguration : हे केवळ विमानाचेच नव्हे, तर विदर्भ विकासाचे टेकऑफ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM. Devendra Fadnavis : बेलोरा विमानतळावरून प्रवासी विमानसेवेचा प्रारंभ तसेच एअर इंडियाच्या पायलट ट्रेनिंग स्कूलच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमात बुधवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Amravati Airport
Amravati Airport Agrowon
Published on
Updated on

Amravati News : अमरावती ः बेलोरा येथील विमानतळावरून विमानाचे उड्डाण म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बेलोरा विमानतळावरून प्रवासी विमानसेवेचा प्रारंभ तसेच एअर इंडियाच्या पायलट ट्रेनिंग स्कूलच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमात बुधवारी (ता. १६) ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजारापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आकाश फुंडकर, खासदार बळवंत वानखडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय खोडके, आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार गजानन लवटे, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय उपस्थित होते.

Amravati Airport
Devendra Fadnavis: विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदीबाबत काय म्हणाले? ते जाणून घ्या

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आशिया खंडातील सर्वांत मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर अमरावतीला होणार आहे. त्यामुळे अमरावतीचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित होईल. दरवर्षी १८० पायलट अमरावतीत तयार होतील, शिवाय टेक्स्टाईल्स पार्कच्या माध्यमातून दोन लाख लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय विमान उड्डाण मंत्री किंजारापू राममोहन नायडू म्हणाले, की बेलोरातून विमानाचे उड्डाण ही अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती आहे. केवळ विमान उड्डाणापुरतेच मर्यादित न राहता विमानतळावर आधारित कार्गो तसेच अन्य संसाधनाच्या विकासावर भर देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पायलट ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून अमरावतीचे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे, असे त्यांनी सांगितले.

वैनगंगा, नळगंगा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू

विदर्भातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्यासाठी राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सात लाख कोटींच्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम यावर्षीपासूनच सुरू करण्याचे निर्देश आपण संबंधित यंत्रणेला दिले आहेत. पश्चिम विदर्भातील पाच आणि पूर्व विदर्भातील दोन जिल्ह्यांतील जवळपास १० लाख हेक्टर शेतजमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पायलट बदलले, मात्र विमानाची दिशा कायम

आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ज्यावेळी मी विमानाचा पायलट होतो त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे दोघे सहवैमानिकाच्या भूमिकेत होते. राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या विकासकामांचा धडाका पाहून विरोधकांच्या पोटशूळ उठले आहे. अनेक कोटींचे करार झाले आहेत. आज विमानाचे पायलट (मुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस असले तरी राज्याच्या विमानरूपी विकासाची दिशा मात्र वेगवान आहे आणि को-पायलट म्हणून आपली व अजितदादांची त्यांना समर्थ साथ असल्याचे ते म्हणाले.

वेळेत बदल करणे अपेक्षित बेलोरा विमानतळावरून आज पहिल्या विमानाने उड्डाण केले असून ही बाब अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती करणारी आहे. बेलोरावरून उडणाऱ्या विमानाच्या वेळा गैरसोयीच्या असल्याने संबंधित एअर लाइन्सकडून नागरिक, अधिकारी व व्यापाऱ्यांच्या सुविधेप्रमाणे त्यामध्ये बदल करणे अपेक्षित आहे. कारण वेळापत्रकच जुळत नसेल तर प्रवासी संख्या घटेल व पर्यायाने संबंधित एअर लाइन्सने विमानफेऱ्या बंद केल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. मात्र बेलोराच्या बाबतीत तसे होऊ नये, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com