Panchayat Raj Agrowon
ॲग्रो विशेष

Panchayat raj Abhiyan : पंचायत राज अभियानात पुणे विभागात सोलापूर जि. प. प्रथम

solapur ZP : यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानाअंतर्गत पुणे विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेला तर पंचायत समिती गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पंढरपूर पंचायत समितीला मिळाला आहे.

Team Agrowon

Solapur News : यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानाअंतर्गत पुणे विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेला तर पंचायत समिती गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पंढरपूर पंचायत समितीला मिळाला आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२३-२४ अंतर्गत उपायुक्त विजय मुळीक यांच्या नेतृत्वाखालील विभागीय समितीने २५ जुलै रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रस्तावाची क्षेत्रीय तपासणी केली होती.

सोलापूर जिल्हा परिषदेने समितीसमोर माझी सुंदर शाळा, सायकल बँक आणि वारी नियोजनासह जिल्हा परिषदेकडून सरकारच्या योजनांची होणारी अंमलबजावणी, खर्चाचे नियोजन, यासंबंधीचे प्रभावीपणे सादरीकरण केले होते.

त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेला जिल्हास्तरावर १७०.१ व विभागस्तरावर १६९.१० गुण मिळाले आहेत. तर पंढरपूर पंचायत समितीनेही याच पद्धतीने कामकाज करून प्रथम क्रमांक पटकावला. सोलापूर जिल्हा परिषदेचा प्रस्ताव आता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दाखल होणार आहे.

सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आम्ही करतो आहोत. दस्तऐवजांचे जतन, देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदवह्या याबाबत वेळोवेळी आढावा घेत आहोत. आमच्या कामामुळे हा पुरस्कार मिळाला, आता राज्यस्तरावरही संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात आज ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

Leopard Terror : बिबट्याच्या हल्ल्यांचा बंदोबस्त करा

Fertilizer Shortage: रब्बीतही खतांची टंचाई जाणवणार ? खत पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांचे मौन

Rohit Pawar : अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण मुख्यमंत्री निवासस्थानी ४० लाखांहून अधिक खर्च, रोहित पवारांचा हल्लाबोल

Marathwada Rainfall : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील पावसाचा जोर झाला कमी

SCROLL FOR NEXT