Banking Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Bank Loan : सोलापूर जिल्हा मध्यवर्तीनं दिलं कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख कर्ज वसूलीचं टार्गेट

Solapur News : दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून रब्बी व खरीप हंगामात जवळपास ९० हजार शेतकऱ्यांना एक हजार कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले जाते.

Team Agrowon

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गरजेला कर्जरूपाने अर्थसहाय करूनही २३ हजार १९९ शेतकऱ्यांनी अद्याप कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरु केली असून ३० सप्टेंबरपर्यंत योजनेची मुदत आहे.

तरीपण, अजूनही २२ हजार ६८१ जणांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे आता बॅंकेतील प्रत्येक शिपाई, लिपिक, शाखाधिकाऱ्यांना ५० लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून रब्बी व खरीप हंगामात जवळपास ९० हजार शेतकऱ्यांना एक हजार कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा ८० टक्क्यांपर्यंत बॅंकेने कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २०० हून अधिक शाखा असलेली एकमेव जिल्हा बॅंक आहे. परंतु, ३० जूनअखेर शेतकऱ्यांकडे बॅंकेची अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे तब्बल ७४५ कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. त्याची वसुली सुरु असतानाच आता जुन्या थकबाकीदारांमुळे बॅंकेची डोकेदुखी वाढली आहे.

बॅंकेवर प्रशासकराज येऊन आता दोन वर्षाचा कालावधी संपला, पण थकबाकीची अपेक्षित वसुली झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता बॅंकेतील शिपायापासून शाखा अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या गावातील, परिसरातील पाच थकबाकीदारांकडील कर्जाच्या वसुलीचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे.

तरीदेखील आतापर्यंत ‘ओटीएस’मधून २३ हजार १९९ पैकी ५१८ शेतकऱ्यांनीच कर्जाची थकबाकी भरली आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन बॅंकेने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: मोदी, शहा हे गद्दार; त्यांनी देश विकला : राहुल गांधी

Heatstroke Cases: उष्माघाताचे राज्यात २१९ रुग्ण

India Growth Rate: भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवर

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

Brazil Ethanol Production: ब्राझीलचा इथेनॉल उत्पादनावर भर

SCROLL FOR NEXT