Bank Loan : बँकांनी कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढावीत

Sangli District Commissioner : जिल्ह्यातील सर्वच बॅंकाना दिलेल्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. बँकांनी त्यांच्याकडे असलेली कर्जप्रकरणे प्रलंबित न ठेवता ती तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
bank loan
bank loan Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील सर्वच बॅंकाना दिलेल्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. बँकांनी त्यांच्याकडे असलेली कर्जप्रकरणे प्रलंबित न ठेवता ती तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या वेळी बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनलचे उपअंचलिक प्रबंधक किरण पाठक, अग्रणी जिल्हा प्रबंधक महेश हरणे, ‘आरबीआय’चे अग्रणी जिल्हा अधिकारी नरेंद्रकुमार कोकरे, ‘नाबार्ड’चे डीडीएम नीलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, ‘केव्हीआयबी’ सांगलीचे राजेश मिरजकर, महामंडळांचे व्यवस्थापक व जिल्ह्यातील बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

bank loan
Crop Loan : परभणीत जूनअखेरीस ३२.६६ टक्के पीककर्जाचे वाटप

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, की ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्या नावावर असलेल्या सात-बारा व इतर हक्कामधून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी बँकांनी तातडीने संबधितांना कर्ज परतफेड केल्याबाबतचे पत्र द्यावे. शैक्षणिक सत्र सुरू होत असून शैक्षणिक कर्जासाठी बँकांनी मदत करावी.

bank loan
Crop Loan : बँकांनी उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज द्यावे ः शंभरकर

जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक महेश हरणे म्हणाले, की कृषी व तत्सम क्षेत्रासाठी मार्च २०२३ अखेर ५ हजार १३५ कोटी रुपये (उद्दिष्टाच्या १०७ टक्के), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी ३ हजार ३९८ कोटी रुपये (उद्दिष्टाच्या २३० टक्के), अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी ५६१ कोटी रुपये (उद्दिष्टाच्या ९५ टक्के), एकूण प्राथमिक क्षेत्राकरिता ९ हजार ९४ कोटी रुपये (उद्दिष्टाच्या १३२ टक्के) तसेच एकूण अप्राथमिक क्षेत्राकरिता ८ हजार ९५७ कोटी रुपये (उद्दिष्टाच्या ३९७ टक्के), असे एकूण १८ हजार ५१ कोटींचे कर्ज बँकांनी वितरित केले असून याची टक्केवारी उद्दिष्टाच्या १९८ टक्के पूर्ण झाली आहे.

या बैठकीत कर्ज, पीककर्ज, अटल पेन्शन योजना, मुद्रा योजना, यासह विविध योजनांच्या कर्जाच्या माहितीबाबात सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान, ‍सांगली जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिस्ट्रीक्ट क्रेडीट प्लॅन २०२३-२४ या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com