Sugar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Smuggling : निर्बंध तोडत साखरेची बांगलादेशला तस्करी

Sugar Production : मेघालय बनले केंद्र बिंदू; सीमा सुरक्षा दलाकडून हजारो टन साखर जप्त

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर ः केंद्राने साखर निर्यात बंदी केली असली तरी भारतातून बांगलादेशला साखरेची तस्करी होतच आहे. मेघालय हे साखर तस्करीचे केंद्र बनले इथूनच साखरेची तस्करी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सीमा सुरक्षा दलानेच अनेक कारवाया करत हजारो टन साखरेची तस्करी रोखली आहे. विशेष म्हणजे ही तस्करी भारतीय नागरिकांकडूनच होत आहे. मेघालय सरकारने मात्र ही तस्करी रोखण्याचे काम सीमा सुरक्षा दलावर असल्याचे सांगत हात झटकले आहेत.

राज्य सरकारकडे तस्करी रोखण्याबाबत कोणतेच आदेश नसल्याचे सांगत मेघालय सरकारने ही बाब फारशी गांभिर्याने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्राने यंदाच्या हंगामात साखरेच्या निर्यातीला बंदी घातली आहे. कोणत्याही परिस्थितीस साखर देशाबाहेर जावू नये यासाठी कडक पावले उचलली आहेत. अशा परिस्थितीतही रस्ता मार्गाने ही तस्करी बांगलादेशला होत आहे. शेकडो ट्रक साखर अवैध पद्धतीने देशाबाहेर जात असल्याचे उघड झाले आहे. ही साखर आसाममधून मेघालयात येते तेथून ती गारो खोऱ्यातून बांगलादेशकडे पाठविली जाते. सीमासुरक्षा दलाने आता पर्यंत ज्या कारवाया केल्या आहेत त्या कारवायांमधून भारतीय नागरिकांनाच अटक करण्यात आली आहे. याचाच अर्थ भारतातूनच तस्करीसाठी मोठे प्रयत्न होत असल्याचे उघड होत आहे.

या जवानांकडून गेल्या काही महिन्यांत शेकडो ट्रक साखर पकडण्यात आली. पुरेशी कागदपत्रे नसल्याने हजारो टन साखर ताब्यात घेण्यात आली. हे प्रकरण स्थानिक पोलिसांना सोपवल्यानंतर तेथून तपास थंड होत असल्याचे निदर्शनास येत आहे.


तक्रारींची गांभिर्याने नोंद नाही
तस्करी करण्यात येणारी साखर कोणत्या कारखान्यात तयार झाली, ती कोठे विकण्यात आली याचा तपशील घेऊन आंतराष्ट्रीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी संबंधित कारखान्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. पण तसे न होता उलट तस्करीत वाढच होत असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या कारवायांतून दिसून येत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारीही झाल्या पण त्याची फारशी गांभिर्याने नोंद घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT