Summer Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Crop Planning : नियोजन उन्हाळी हंगामातील पिकांचे

Crop Management : उन्हाळी हंगामात पिकांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने पिकांची निवड, लागवडीसाठी जमीन, पेरणी अंतर, वेळ, बियाणे प्रमाण, बीजप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन आदी बाबींविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

डॉ. आदिनाथ ताकटे 

Farmer Guidance :

उत्पादन कमी येण्यामागील कारणे

सतत बदलते हवामान.

योग्य वेळी पेरणी न करणे.

अयोग्य अंतरावर पेरणी.

अयोग्य सिंचन व्यवस्थापन.

वाणांची अनुपलब्धता.

सेंद्रिय व जैविक खतांचा अभाव.

रासायनिक खतांचे असंतुलित व्यवस्थापन.

कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव.

उन्हाळी भुईमूग

जमीन

मध्यम प्रकारची, भुसभुशीत, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी.

हलक्या जमिनीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

लागवडीसाठी जमीन तयार करताना नांगरणीची खोली १२ ते १५ सेंमी एवढीच असावी.

जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात.

पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना किंवा वखराने काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.

पेरणी

पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी

पेरणी करताना उपट्या जातींसाठी दोन ओळींत अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

निम पसऱ्या जातींसाठी ४५ बाय १० सेंमी इतके अंतर ठेवावे.

बियाणे प्रमाण (प्रति हेक्टर)

दाण्यांचा आकार कमी असलेल्या वाणांसाठी : १०० किलो

मध्यम आकाराचे दाणे असलेल्या वाणासाठी : १२५ किलो

टपोरे दाणे असलेल्या वाणासाठी : १५० किलो

वाण

एसबी ११, टीएजी-२४, टीजी -२६, जेएल -५०१, फुले ६०२१ ः हेक्टरी १०० किलो बियाणे

फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी-४१, फुले उनप, फुले भारती ः हेक्टरी १२५ किलो बियाणे.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास, थायरम ५

ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३

ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति

किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत १० टन प्रति हेक्टरी प्रमाणे कुळवणीच्या वेळी द्यावे.

पेरणी करतेवेळी नत्र २५ किलो, स्फुरद ५० किलो अधिक जिप्सम २०० किलो प्रति हेक्टरी द्यावे. उर्वरित २०० जिप्सम किलो आऱ्या सुटताना द्यावे.

मध्यम काळ्या जमिनीत अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी हेक्टरी ५ टन शेणखत पूर्व मशागतीच्या वेळी व शेवटच्या कुळवाच्या अगोदर द्यावे. शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के खते (२५:५० नत्र:स्फुरद किलो प्रति हेक्टरी) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून ९ समान हप्त्यात द्यावे.

उन्हाळी सूर्यफूल

लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत लागवड करू नये.

पेरणी

उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

मध्यम खोल जमिनीत ४५ बाय ३० सेंमी व भारी जमिनीत ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी

करावी. संकरित आणि जास्त कालावधीच्या वाणांची ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बियाणे व खत एकाच वेळी पेरता येते.

बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.

बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.

वाण

सुधारित वाण : फुले भास्कर, भानू, एस एस ५६,

संकरित वाण : केबीएसएच ४४, फुले रविराज, एमएसएफएच १७

बियाणे प्रमाण (प्रति हेक्टर)

सुधारित वाण : ८ ते १० किलो

संकरित वाण : ५ ते ६ किलो

बीजप्रक्रिया

(प्रमाण : प्रतिकिलो बियाणे)

मर रोगाच्या प्रतिबंधासाठी थायरम २ ते २.५ ग्रॅम,

केवडा रोग टाळण्यासाठी ॲप्रोन (३५ एसडी) ६ ग्रॅम.

त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी नत्र ३० किलो, स्फुरद ६० किलो व पालाश ६० किलो याप्रमाणे द्यावे. उर्वरित नत्राची मात्रा खुरपणी झाल्यानंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावी.

गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

उन्हाळी मूग

कमी पाण्यात, कमी दिवसांत आणि कमी खर्चात येणारे हे कडधान्ये पीक आहे.

लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.

क्षारयुक्त, पाणथळ तसेच उतारावरील हलक्या जमिनीत लागवड करू नये.

लागवडीपूर्वी जमिनीची हलकी नांगरट करून कुळवाची पाळी द्यावी.

पूर्वमशागतीवेळी हेक्टरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत

द्यावे.

पेरणी व बियाणे

फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिल्या पंधरवडा या दरम्यान पेरणी करावी.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी, तर दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे. पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे.

वाण

पुसा वैशाखी, वैभव, पी.के.व्ही ग्रीन गोल्ड, बीएम-२००२-०१, बीएम-२००३-२, फुले एम-२, उत्कर्ष, फुले सुवर्ण. हे सर्व वाण साधारणपणे ६५ ते ७० दिवसांत तयार होतात.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास, कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक यांची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे. त्यानंतर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी

६ ते ८ टन प्रमाणे कुळवणीच्या वेळी द्यावे.

पेरणीवेळी नत्र २० किलो, स्फुरद ४० किलो किंवा डीएपी १०० किलो प्रति हेक्टरी द्यावे.

पीक फुलोऱ्यात असताना युरिया (२ टक्के)

२० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी

करावी.

शेंगा भरताना डीएपी (२ टक्के) २० ग्रॅम

प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(टीप- बीजप्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित बियाणास कोणत्या रसायनांची प्रक्रिया केली आहे

याची खात्री करावी. त्यानंतर शिफारशींचा वापर करावा.)

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Biofertilizers: जैविक निविष्ठांच्या विक्रीतून ‘महाबीज’ला २.३९ कोटींचा महसूल

Vidarbh Fuel Shortage: विदर्भात ऐन खरीप हंगामात डिझेल टंचाईचा फटका

Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनमधील तेजी टिकून तूर, मका हरभरा भाववाढीचे संकेत

Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT