Complementary Business Agrowon
ॲग्रो विशेष

Complementary Business : अल्पभूधारक महिलांना मिळाला पूरक व्यवसायाचा पर्याय

complementary business option : जत शहरापासून पंधरा किलोमीटरवर वसलेलं बिळूर गाव. गावाकडं जाताना दोन्ही बाजूला माळरानावर कुसळच दिसतं होती.

Abhijeet Dake

अभिजित डाके

Sangli News : जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्‍यातील बिळूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) सुमारे ४२ गटांतील ५४६ महिलांनी शेतकरी बचत गटाद्वारे वैयक्तिक कुक्कुटपालन आणि गाई, शेळीपालन सुरू केले आहे.

कुक्कुटपालन, शेळीपालन, गाईपालन करून महिला व्यावसायिक बनलेल्या आहेत. पूरक व्यवसायाच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याचा पर्याय त्यांनी दुष्काळी भागात तयार केला आहे. जत शहरापासून पंधरा किलोमीटरवर वसलेलं बिळूर गाव. गावाकडं जाताना दोन्ही बाजूला माळरानावर कुसळच दिसतं होती.

ना शाश्‍वत पाण्याची सोय. द्राक्ष हंगाम सुरू झाला, की तीन-चार महिने काम. त्यानंतर आठ महिने रोगजार नाही. त्यामुळं पोटाची खळगी भरणंही मुश्कील असे चित्र होते. सुरुवातीला महिला बचत गट म्हणजे काय, हे येथील महिलांना माहिती नव्हते. जिल्हा परिषदेकडील महिला आर्थिक विकास महामंडळ गावात पोहोचले. सुरुवातीला गावात एक-दोन बचत गट स्थापन करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली.

त्यामध्ये महिलांना मार्गदर्शन केले. बचत गट स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रत्येक सदस्यांनी प्रति महिना ५० रुपयांची बचत करण्यास सुरुवात केली. स्थापन झालेला गट महामंडळाकडे जोडला. त्यातून महिलांना शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन केले. प्रत्येक सभासदांनी गाईपालन, परसबागेतील कुक्कुटपालन, पोल्ट्री व्यवसाय अशा व्यवसायांची निवड केली. प्रत्येकाला व्यवसायाला लागणारा कर्जपुरवठा केला जातो. वेळेत परत फेडही केली जाते.

वीस पक्ष्यांपासून ते शंभर पक्षी

जत तालुक्‍याचा उल्लेख केवळ दुष्काळी प्रश्‍नासाठी नेहमी येतो. गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत बिळूर या गावातील महिलांमध्ये मात्र उत्साह संचारला आहे. भक्ती, सुषमा, श्रद्धा, मल्लिकार्जुन, विघ्नेश्‍वर संघर्ष या सहा महिला शेतकरी गटांसह सर्व महिलांनी वैयक्तिक कुक्कुटपालनाच्या व्यवसायात आगेकूच केली आहे. गटातील प्रत्येक महिला २० पक्ष्यांपासून शंभर पक्ष्यांपर्यंत कुक्कुटपालन व्यवसाय करतात. आज गावात सुमारे १० हजार देशी कोंबड्यांचे संगोपन केले जाते.

अंडी विक्रीतून नफा

सौ. शिवगंगा बिरादार या कोंबड्यांचे व्यवस्थापन करतात. घरगुती व्यवसाय करताना गेल्या महिन्यात १०० डी. पी. क्रॉस या जातीची देशी कोंबड्यांची एक महिना वयाची पिले आणली. त्यासाठी केवळ बाराशे रुपयांची गुंतवणूक केली. कोंबड्याची सुमारे सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत प्रति पक्ष्यांची विक्री केली जाते.

कोंबडी प्रति आठवड्याला ४० ते ५० अंडी देतात. जत शहराचा आठवडा बाजार आणि गावात अंड्याची आठ रुपयांना प्रति नग दराने विक्री होते. आठवड्याला तीनशेवीस ते चारशे रुपयांपर्यंत रक्कम मिळते. पक्षी विक्रीपेक्षा अंड्यांच्या विक्रीतून नियमित नफा मिळत असल्याचे शिवगंगाताईंनी सांगितले. या कामी त्यांना संपूर्ण कुटुंब मदत करते.

शैलाताईंनी उभारली द्राक्ष बाग सन २०१५ ला श्रद्धा महिला बचत गट स्थापन केला. गटातील प्रत्येक महिलांना १५ ते २० हजार रुपयांचे कर्ज मिळालं. त्यातून शेळीपालन, कुक्कुटपालन असे व्यवसाय सुरू केले. त्याच गटातील शैला प्रधाने यांना देखील तेवढेच कर्ज मिळाले. त्यातून गाई, शेळीपालन केले. घेतलेल्या कर्जाची परत फेड झाली. आता कर्ज घेणे आणि परतफेड होत असल्याने कर्जाची रक्कमही वाढून मिळाली. आता शेतीपूरक व्यवसायातून चार रुपये शिल्लक पडत होते. मग गटातून कर्ज घेऊन द्राक्ष बाग लावण्याचा निर्धार केला. द्राक्ष पिकाला गटातून दीड लाख कर्ज मिळाले. सन २०१९ मध्ये एक एकर माणिक चमन द्राक्ष बागेची उभारणी केली. त्यातून मुलांचे शिक्षणही पूर्ण झाले.
शैला प्रधाने, ९३०९९९५०५४ अध्यक्ष, श्रद्धा महिला बचत गट, बिळूर कन्याकुमारी बिराजदार, ८३२९९०२२१९ सहयोगिनी, क्रांती लोकसंचलित साधन केंद्र, जत

थोडक्यात महत्त्वाचे  जत तालुक्यात ३८४ बचत गटांची स्थापना  आजअखेर २५ कोटींचे कर्ज वितरण  सुमारे २१८५ महिलांना रोजगार उपलब्ध  महिलांचे आरोग्य तपासणी  मुरघास, मका भरडचे युनिट  आर्थिक साक्षर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT