Contaminated water supply  Agrowon
ॲग्रो विशेष

Contaminated Water Supply : पाण्याच्या टाकीत गाळ आणि शेवाळ

Water Supply : अशुद्ध पाणीपुरवठा का होत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला असता गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीत प्रचंड गाळ आणि शेवाळचा थर जमा झाल्याची निदर्शनास आले असल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे.

Team Agrowon

Amravati News : मागील काही दिवसांपासून गावाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. अशुद्ध पाणीपुरवठा का होत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला असता गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीत प्रचंड गाळ आणि शेवाळचा थर जमा झाल्याची निदर्शनास आले असल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे.

मागील कित्येक महिन्यांपासून नेरपिंगळाई गावाला अशुद्ध पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांमध्ये होती. ग्रामपंचायतला वारंवार या संदर्भामध्ये माहिती देऊन सुद्धा कुठलीही कार्यवाही न होत असल्याचे पाहून काही नागरिकांनी याबाबत स्वतःच यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.

काही तरुणांनी गावाच्या मुख्य पाण्याच्या टाकीवर जाऊन बघितले असता त्यामध्ये अनेक वर्षांपासून गाळ, कचरा आणि शेवाळ जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लहान मुलांमध्ये साथीचे रोग पसरत आहेत. अनेक लहान मुलांना घशाचे आजार होत असताना दिसत आहेत. ही टाकी अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने साफ केले नसल्याचे निदर्शनात आले असल्याने गावकऱ्यांचा ग्रामपंचायत विरुद्ध रोष वाढत आहे.

पाणीपुरवठा स्रोतांची स्वच्छता नियमित करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते. त्यासाठी ग्रामपंचायतीला सामान्य करातून खर्च करण्याची सुद्धा मुभा असते. परंतु ग्रामपंचायतच्या बेजबाबदार आणि वेळकाढूपणाच्या धोरणामुळे मुख्य पाण्याचे टाकी मधला शेवाळ घाण आणि कचरा साफ न केल्यामुळे या टाकीत किमान एक दीड फुटाचा घाणीचा थर जमा झाल्याची दिसून येत आहे. या टाकीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये पोटाचे, घशाचे विकार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

व्हॉल्व्हच्या भोवती प्रचंड घाण

पाण्याच्या टाकी खाली असणाऱ्या व्हॉल्व्हच्या भोवती प्रचंड कचरा आणी घाण जमा झाल्याचे दिसून येत आहे. व्हॉल्वभोवती घाण पाणी आणि कचरा साचल्याने पुन्हा तेच पाणी व्हॉल्वच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत जात असल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

याबाबत ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सचिवांना निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर पाण्याची टाकी व इतर पाण्याचे स्रोत याची स्वच्छता करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पाण्याच्या टाकीतील गाळ व घाणीबाबत तक्रार प्राप्त होण्याआधीच टाकीची साफसफाई सुरू केली. टाकीची साफसफाई वारंवार व नियमित करण्यात येते.
- विनोद मनवर, ग्रामसचिव, नेरपिंगळाई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT