Water Contamination : पावसाळ्यात ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले

Water Pollution : सध्या पावसाळा संपलेला नाही. अधूनमधून पाऊस येत आहे. अशा काळात ग्रामपंचायतींकडे ब्लिचींग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील विविध गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेले आहेत.
Contaminated Water
Contaminated WaterAgrowon
Published on
Updated on

Akola News : सध्या पावसाळा संपलेला नाही. अधूनमधून पाऊस येत आहे. अशा काळात ग्रामपंचायतींकडे ब्लिचींग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील विविध गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेले आहेत.

पाण्याच्या एक हजार ५४५ पैकी ६९ नमुने दूषित आढळून आले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामीण भागात खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होते. नागरिकांना पर्याय नसल्याने दूषित पाणीच प्यावे लागते आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचिंग पावडर खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरिकांना केला जाणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडरविना होत असतो.

Contaminated Water
Water Contamination : दूषित पाण्याचे प्रमाण वाढले

पाण्यावर प्रक्रियाच होत नसल्याने थेट गढूळ पाणी मिळते. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ब्लिचिंग पावडर नसल्याने व इतर कारणांमुळे अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आल्याची बाब जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणी अहवालातून समोर आली आहे.

Contaminated Water
Contaminated Water : नाशिक जिल्ह्यात १४९ गावांतील पाण्याचे नमुने दूषित

दूषित पाणी प्यायल्यामुळे कॉलरासह इतर साथरोग होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे ते स्वच्छ दिसणारे पाणी सुद्धा शुद्ध पाणी समजून पितात, परंतु ते आरोग्यास अपायकारक असते. दरम्यान अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात साथरोगाची भीती वाढली आहे.

दूषित पाण्याचे नमुने

तालुका तपासणी दूषित नमुने

अकोला २०९ १८

अकोट १५१ ०३

बाळापूर ११५ ०५

बार्शीटाकळी १५० ०३

पातूर १२१ ०२

तेल्हारा ११९ ०५

मूर्तिजापूर १३१ ०१

एकूण ग्रामीण ९९६ ३७

शहरी ५४५ ३२

एकूण जिल्हा १५४५ ६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com