Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी पीक कर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे ८०० कोटी रुपये पीक कर्ज वितरित करायचे आहे. रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. आता नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरीदेखील पीक कर्ज वितरणाची गती संथ आहे.

राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. शेतकरी नव्या पीक कर्जाचे प्रस्ताव घेऊन बँकेत जात आहेत. परंतु बँका शेतकऱ्यांना शाखेत प्रवेश देत नाहीत. अनेक शाखांमध्ये कर्मचारीसंख्या कमी आहे. शाखाधिकारी, व्यवस्थापक नसतात, यामुळे प्रस्तावावर निर्णय होत नाही.

नवे बँक खाते संबंधित बँकेत उघडले जात नसल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६०० कोटी, धुळ्यात ८० आणि नंदुरबारात ११० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील पीक कर्ज फक्त ६० टक्केच वितरित झाले होते. शासन किंवा प्रशासन पीक कर्ज वितरण लक्ष्यांक निश्चित करते, परंतु बँकांना पीक कर्ज निधीची व्यवस्था करावी लागते.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी २० कोटींवर पीक कर्ज वितरण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज वाटपात आघाडीवर आहे. पीक कर्ज वितरण या बँकेने मागील काही दिवसांतच सुरू केले. ग्रामीण भागात या बँकेच्या शाखा अधिक आहेत.

तसेच सोसायट्यांच्या मदतीने किंवा माध्यमातून बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देते. बँकेने पीक कर्ज वितरण इतर बँकांच्या तुलनेत सुरवातीपासून अधिक केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीक कर्ज वितरण ऑक्टोबरच्या महिन्यातच सुरू झाल्याची माहिती मिळाली. यातच जशी वसुली होईल, तसे पीक कर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बँका करतील. वसुली सुरू आहे.

वसुलीनंतर लागलीच पीक कर्ज नूतनीकरण केले जाते व २४ तासात पीक कर्ज राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतात, अशी माहिती मिळाली. परंतु सध्या पीक कर्ज वसुली बंद करावी. कारण मागील खरीपात कमी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वित्तीय अडचणी वाढल्या. कोरडवाहू, बागायतदार शेतकरी संकटात आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT