Khandesh water supply : जळगाव : खानदेशात टँकरची समस्या जुलैतही होती. परंतु ही समस्या दूर झाली आहे. यंदा टंचाई आराखड्यावरची तरतूदही कमी करावी लागणार असून, चांगला पाऊस झाल्याने टंचाई राहणार नाही, अशी स्थिती आहे. . जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर तालुक्यातील अनेक गावांत २०२३ मध्ये एप्रिल महिन्यापासून दुष्काळाचा भीषण सामना करावा लागला होता. २०२४ मध्येही समस्या काही गावांत होती. यंदाही जुलैत टँकर सुरूच होते. जुलै अखेर व ऑगस्टमध्ये पाऊस काही भागात कमी होता. विहिरी, पाणी योजना स्रोतांचे पुनर्भरण करण्यास पुरेसा पाऊस नसल्याने या काळातही काही गावांत टंचाई कायम होती. चाळीसगाव, अमळनेरात सुमारे १२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा ऑगस्टमध्ये सुरू होता. .Khandesh Rainfall : खानदेशात गिरणा, बोरी, अंजनी, तापी, पांझरा नद्या झाल्या प्रवाही.प्रशासनाने अमळनेरात विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. चाळीसगाात मन्याड, गिरणा धरण आहे. वरखेड लोंढे प्रकल्प अलीकडे तयार झाला आहे. अमळनेर तालुक्यातून तापी, बोरी व पांझरा नद्या वाहतात. मात्र, सिंचनाबाबत चाळीसगाव व अमळनेर तालुका तहानलेलाच असतो. यामुळे पावसाळ्यातही टंचाई असते. यंदा मात्र टंचाई दूर झाली. कारण अनेक पाणी योजनांचे स्रोत बळकट झाले. नद्यांना पाणी वाहत आहे. .Khandesh Water Project : खानदेशातील सर्वच प्रकल्प भरले.टँकरची संख्या घटू शकते पावसामुळे चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात टँकरचे प्रस्ताव ऑगस्टमध्ये येण्याची स्थिती नव्हती. टँकर काही भागात सुरू होते. ते सप्टेंबरमध्ये बंद झाले. आता कुठेही टँकरबाबत मागणी नाही. कारण पाण्याची समस्या दूर झाली आहे. त्यातच अधिग्रहीत केलेल्या काही विहिरींचीही फारशी गरज गावांत नाही. पाऊस आल्यानंतर टँकरसंख्या कमी झाली. ती सध्या शून्यावर आहे. पुढेही टँकरची गरज कमी राहील, अशी अपेक्षा किंवा अंदाज प्रशासन, ग्रामपंचायती व्यक्त करीत आहेत..अमळनेरात मजबूत जलस्रोतांचा अभावयातच तापी नदीवरील निर्माणाधिन असलेला पाडळसरे प्रकल्प सोडला, तर दुसरा एकही सिंचन प्रकल्प अमळनेर तालुक्यात नाही. बोरी व पांझरा नदीवर साठवण व केटी वेअर बंधारे असले, तरी उन्हाळ्यात बहुतांश बंधारे कोरडेठाक पडलेले होते. आता पाऊस बऱ्यापैकी झाला. प्रकल्पांत जलसाठे मुबलक आहेत. टंचाईची समस्या दूर झाल्याची स्थिती आहे. यंदा टंचाई आराखड्यावरील खर्च मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी करावा लागणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. मन्याडसह गिरणा धरणात जलसाठा चांगला असल्याने टंचाई नसणार, अशी स्थिती आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.