Kolhapur River Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur River Flood : पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ घट; १०४ मार्ग बंद, अद्यापही पाणी धोका पातळीवर

Almatti Dam : सध्या अलमट्टी धरणातून दोन लाख ९६ हजार ७९४ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

sandeep Shirguppe

Panchaganga River Flood : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे काल आणि आज मिळून जवळपास दिड फुटांनी पाणी पातळी उतरली आहे. दिवसभरात काही काळ सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. सध्या राधानगरी धरणातील फक्त दोन स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील काही भागात अत्यंत संथ गतीने पूर ओसरू लागल्याने काही अंशी वाहतूक सुरळीत होत आहे.

पंचगंगेची पातळी कमी होत असली, तरी पाणी अजून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आज सकाळी १० वाजता मिळालेल्या माहितीनूसार पाणी पातळी ४६.३ फूट इतकी होती. पाणी ओसरलेल्या भागात ग्रामीण भागातील कर्मचारी तर शहरात महापालिकेने तातडीने औषध फवारणी करून घेतली.

अद्याप जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण असे एकूण १०४ मार्ग बंद आहेत. तसेच ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. यामुळे नागरिकांसह जनावरांचे स्थलांतर सुरूच आहे. काल दिवसभरात ६ हजार २१० नागरिकांचे, १ हजार ६७७ कुटुंबांचे व ३ हजार १११ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २१ हजार हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.

अलमट्टीतून अद्यापही विसर्ग

सध्या अलमट्टी धरणातून दोन लाख ९६ हजार ७९४ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून ३२ हजार १०० क्युसेक, राधानगरी धरणातून ४ हजार ३५६ क्युसेक, वारणा धरणातून १६ हजार ९७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

७२ गावांना पुराचा फटका

जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आला असून नदी कार्यक्षेत्रातील ७२ गावांना त्याचा थेट फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात हजारो हेक्टर क्षेत्र आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, कुंभी, कासारी, कडवी, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आदी नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी या नद्यांच्या परिसरात विस्तीर्ण पसरलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT