Skill India Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Skill Development : नाशिक जिल्ह्यातील २९ गावांत कौशल्य विकास केंद्रे

Nashik Skill Development Centers : ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी गुरुवार (ता. १९) ऑक्टोबर राज्यातील ५११ गावांत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन झाले.

Team Agrowon

Nashik News : ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी गुरुवार (ता. १९) ऑक्टोबर राज्यातील ५११ गावांत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन झाले. यात नाशिक जिल्हातील २९ गावांतील कौशल्य विकास केंद्रांचा समावेश आहे.

या उद्‌घाटन कार्यक्रमास दूरदृश्‍यप्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर नाशिक तालुक्यातील प्रिंपी सय्यद गावातील आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक अनिसा तडवी, प्रिंपी सय्यद गावाचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, उपसरपंच सुकदेव पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूरचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, नूतन माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज प्रिंपी सय्यदचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद व गावकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील युवक-युवतींना भविष्यातील रोजगाराच्या संधी व त्यादृष्टीने आत्मसात करावयाची कौशल्ये याबाबत संबोधन केले. कार्यक्रम प्रसंगी पळसे ग्रामपंचायत येथे आमदार सरोज आहीरे, वडाळीभोई ग्रामपंचायत येथे आमदार डॉ. राहुल आहेर, ताहाराबाद ग्रामपंचायत येथे आमदार दिलीप बोरसे, मोहाडी ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल तर इतर ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

प्रिंपी सय्यद गावाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कार्यक्रमानंतर प्रिंपी सय्यद ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. या वेळी प्रिंपी सय्यद गावाचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, उपसरपंच सुकदेव पवार व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घेऊन मतदान केंद्र अधिकारी यांच्या सहकार्याने गावातील सर्व मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन या वेळी केले.

जिल्ह्यातील २९ केंद्रे अशी

तालुका गावाचे नाव

नाशिक पळसे,पिंप्री सैय्यद

इगतपुरी वाडीवऱ्हे,टाकेद बु.

त्र्यंबकेश्वर अंजनेरी, हरसूल

पेठ बोरवड,जोगमोडी

सुरगाणा बोरगाव,बाऱ्हे

दिंडोरी कसबे वणी,मोहाडी

कळवण कनाशी, मानूर

देवळा लोहणेर

बागलाण नामपूर,ताहाराबाद

चांदवड वडाळीभोई,रायपूर

मालेगाव टेहरे,झोडगे

नांदगाव वेहेळगाव,हिसवळ खु.

येवला अंदरसूल,नगरसूल

निफाड लासलगाव,चांदोरी

सिन्नर नांदूरशिंगोटे,नायगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT