Skill Development : राज्यातील उद्योजकांसाठी गोव्यात सुविधा व कौशल्य प्रशिक्षण केंद्र

‘‘दोन्ही राज्यांतील उद्योग वाढीसाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येतील. लवकरच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे गोवा येथे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी सुविधा केंद्र व कौशल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल,’’ अशी घोषणा ‘इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.
Skill Developement
Skill DevelopementAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (Maharashtra Chambers of Commerce and Industries) या शतक महोत्सवी शिखर संस्थेतर्फे चेंबरच्या कार्यक्षेत्रातील गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ‘‘दोन्ही राज्यांतील उद्योग वाढीसाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येतील. लवकरच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे गोवा येथे महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी सुविधा केंद्र व कौशल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल,’’ अशी घोषणा ‘इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष ललित गांधी (Lalit Gandhi) यांनी केली.

Skill Developement
Agri Business Management : कृषी क्षेत्रात करिअरला उत्तम पर्याय ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’

‘‘पणजी येथे शुक्रवारी (ता. ७) पार पडलेल्या ‘इन्व्हेस्ट गोवा’ या गुंतवणूक परिषदेत हा सामंजस्य करार झाला. गोवा चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे अध्यक्ष राल्फ डिसूझा यांनी आणि मी सामंजस्य करारावर सह्या केल्या. तसेच या करारांचे आदान-प्रदान केले,’’ असे गांधी यांनी सांगितले. परिषदेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,

Skill Developement
Lumpy Skin : ‘लम्पी’ आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करा

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री मावीन गोदीना, पर्यटन व आयटी उद्योगमंत्री रोहन खुंटे, इन्व्हेस्ट गोवा परिषदेचे निमंत्रक मांगिरिश रायकर आदी उपस्थित होते. या वेळी गोव्याच्या नवीन उद्योग धोरणाच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे महाराष्ट्रात उपलब्ध उद्योगाच्या व नवीन गुंतवणुकीच्या विविध संधींचा अहवाल गांधी यांनी मुख्यमंत्री सावंत यांना सादर केला. २ ते ११ डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे एमसीसीआयए, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या उद्योग विभागातर्फे आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग परिषद होणार आहे. गोवा सरकारला यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. मुंबईत होणाऱ्या या व्यापार उद्योग परिषदेस देशातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आमंत्रण गांधी यांनी उपस्थितांना दिले.

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड ॲग्रिकल्चर व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील.

- प्रमोद सावंत,

मुख्यमंत्री, गोवा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com