Agriculture Technology  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture AI : ‘एआय’, रोबोटिक्स कृषीचा चेहरा बदलणार

Agri Courses : कृषी विद्यापीठाने त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात कौशल्य आधारित विविध कोर्सेसचा अंतर्भाव केलेला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : कृषी विद्यापीठाने त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमात कौशल्य आधारित विविध कोर्सेसचा अंतर्भाव केलेला आहे. या कौशल्य आधारीत कोर्सेसचा विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स येणाऱ्या काळामध्ये कृषीचा चेहरा बदलणार आहे. कृषीमध्ये नवीन गोष्टी शिकणे व शिकत राहणे आताची गरज असल्याचे मत राज्याचे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात रस्तोगी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक सदाशिव पाटील, कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके व कृषी विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे उपस्थित होते.

विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार कृषी विद्यापीठांना बहुविद्याशाखीय धोरण ठेवण्यासाठी ट्रॅडिशनल विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करावे. या कृषी विद्यापीठांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पात ‘एआय’वर मोठे काम सुरू आहे.

या ‘एआय’चा आंतर्भाव कृषी यंत्रे व अवजारे निर्मितीमध्ये करावा. कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाच्या यंत्रणेबरोबर योग्य तो समन्वय साधण्याची आवश्यकता त्यांनी या वेळी व्यक्त केली.

प्रकल्पांना भेटी

मान्यवरांनी विद्यापीठातील विविध प्रायोगिक प्रक्षेत्र कृषी फवारणी ड्रोन प्रयोगशाळा, हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग प्रयोगशाळा, रोबोटिक्स प्रयोगशाळा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, ऑटो पीआयएस सिंचन प्रणाली, सेंटर ऑफ एक्सलन्स, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रयोगशाळा, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, फळे व भाजीपाला बेकरी प्रक्रिया केंद्र, बियाणे विभाग, कोरडवाहू फळपिके प्रकल्प, भाजीपाला प्रकल्प, नर्सरी, प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, धन्वंतरी, जीन बँक, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बांबू प्रकल्प, निवडुंग चारा प्रात्यक्षिक प्रकल्प, कृषी अवजारे प्रकल्प, जैविक खते प्रयोगशाळा व फुले कृषी वाहिनी ९०.८ एफएम या प्रकल्पांना भेटी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT