Tur Production Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Production : नगरमध्ये तुरीचे हेक्टरी सहा क्विंटल उत्पादन

Tur Productivity : नगर जिल्ह्यासह सर्वच भागात यंदा अपुऱ्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका बसल्याचे दिसत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर जिल्ह्यासह सर्वच भागात यंदा अपुऱ्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका बसल्याचे दिसत आहे. नगर जिल्ह्यात यंदा हेक्टरी सरासरी सहा क्विंटल २ किलो म्हणजे एकरी २ क्विंटल तुरीचे उत्पादन निघाले आहे.

कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून हे स्पष्ट झाले आहे. पाथर्डी, संगमनेर, पारनेरमध्ये तुरीच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाली आहे. बाजारात मात्र सध्या तुरीला चांगला दर आहे. नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत तुरीचे पीक घेतले जाते. यंदा खरिपात साधारण ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक हेक्टरवर तुरीचे पीक घेण्याला शेतकऱ्यांनी यंदा प्राधान्य दिले.

मात्र खरिपासह रब्बी हंगामात पावसाने ताण दिला. त्याचा फटका खरिपातील तुरीसह सर्वच पिकांना बसला. तुरीची वाढ खुंटलेली होती. शिवाय, नंतरच्या काळात शेंगांचे प्रमाणही कमी होते. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे.

नगर जिल्ह्यात कृषी विभागाने ३७४ ठिकाणी पीक कापणी प्रयोग केले. त्यानुसार जिल्ह्याचे सरासरी प्रतिहेक्टरी ६०२ किलो ६०४ ग्रॅम उत्पादन निघाले आहे. म्हणजे एकरी २ क्विटंल उत्पादन निघाले आहे.

नेवासा तालुक्यात सर्वाधिक ९४४ किलो, श्रीगोंद्यात हेक्टरी ८२४ किलो, शेवगावात ८१७ किलो, नगरमध्ये ६५२ किलो, तर श्रीरामपूर तालुक्यात ७१० किलो हेक्टरी उत्पादन निघाले. सर्वांत कमी संगमनेरला उत्पादन निघाले आहे.

पारनेरला हेक्टरी ३२५ किलो ६१५ ग्रॅम, पाथर्डीला ३०१ किलो ४१७ ग्रॅम, राहुरीला ६४० किलो ०३८, कोपरगावला ५०७ किलो ६३९ ग्रॅम, राहात्यात ३८५ किलो ४०० ग्रॅम उत्पादन निघाले. तुरीचे सर्वाधिक क्षेत्र जामखेड, कर्जतला असते.

जामखेडला हेक्टरी ६५५ किलो ८१८ ग्रॅम तर कर्जतला ४५९ किलो २२२ ग्रॅम उत्पादन निघाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यंदा तुरीला दर चांगला असला तरी उत्पादनात मात्र कमालीची घट झाली आहे.

दर साडेदहा हजारांपर्यंत

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची सध्या दर दिवसाला शंभर क्विंटलपर्यंत आवक होत आहे. मध्यंतरीच्या काळात तुरीचे दर कमी झाले होते. मात्र आता दरात काहीशी वाढ झाली आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८५०० ते १०५०० व सरासरी ९४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. नेहमीच्या तुलनेत बाजारात आवक कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT