Silo Technology  Agrowon
ॲग्रो विशेष

Grain Storage Technology : धान्य साठवणुकीसाठी सायलो तंत्रज्ञान

Silo Technology : सायलो हे एक पोतेविरहित साठवणुकीचे गोदाम आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्यावर थेट प्रक्रिया केली जाते अशा यंत्रणा किंवा उद्योगांना पोतेविरहीत धान्य साठवणुकीचा सायलो हा प्रकार उपयोगात आणता येऊ शकतो.

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Silo Warehouse : सायलो हे एक पोतेविरहित साठवणुकीचे गोदाम आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्यावर थेट प्रक्रिया केली जाते अशा यंत्रणा किंवा उद्योगांना पोतेविरहीत धान्य साठवणुकीचा सायलो हा प्रकार उपयोगात आणता येऊ शकतो. उदा. पशुखाद्य व पोल्ट्री खाद्य प्रक्रिया उद्योग. अशा उद्योगांनी मका, सोयाबीन काढणीच्या काळात खरेदी केले की साठवणुकीसाठी पोत्यांची आवश्यकता नसते. अशा वेळेस पोतेविरहित धान्य साठवणूक करणे सोईस्कर ठरते.

मोठ्या फीडमिल मार्फत शेतीमालावर प्रक्रिया करून तयार झालेले विक्रीयोग्य पशुखाद्य किंवा कोंबडीखाद्य आवश्यकतेनुसार विक्री करण्यासाठी पोत्यात भरून विक्रीपूर्वी सुरक्षित साठवणुकीसाठी सायलोचा उपयोग करतात.

राज्यातील मोठ्या कृषी प्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योगांमार्फत शेतीमालाचे संकलन व प्रक्रिया केलेल्या मालाच्या साठवणुकीसाठी सायलोचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. केंद्रीय वखार महामंडळ, राज्य वखार महामंडळ आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर सायलो साठवणुकीचा उपयोग केला जातो. जागतिक बँक अर्थसाह्यित स्मार्ट प्रकल्पाच्या साह्याने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने १०,००० टन क्षमतेचे दोन सायलो आणि महामंडळाच्या स्वगुंतवणुकीतून जांबरगाव (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे १०,००० टन क्षमतेचा एक सायलो उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सायलो ही वेगवेगळ्या आकारात बनवलेली दंडगोलाकार रचना आहे. यामध्ये धान्य साठवले जाते. ऑस्ट्रेलियामध्ये सायलो हे पारंपरिकपणे स्टील किंवा काँक्रिटपासून बनवले जातात. सामान्य प्रकारचा सायलो १० ते १८ फूट व्यास आणि ३० ते ५० फूट उंचीचा सरळ दंडगोलाकार टॉवर असतो. गंज प्रतिकारासाठी आतील पृष्ठभागासह फ्यूज्ड ग्लास किंवा पोर्सिलेन स्टीलचा वापर करतात. सायलो धातू, दगडी बांधकाम किंवा लाकूड यांच्या साह्याने बांधले जातात.

सायलो साठवणुकीचे प्रकार :

हॉपर बॉटम सायलो.

फ्लॅट बॉटम सायलो.

नवीन साठवणुकीच्या पद्धतीमध्ये विविध आकार व प्रकारानुसार टॉवर सायलो, बंकर सायलो, बॅग सायलो, सायलेज पाइल्स असे प्रकार आहेत. मोठ्या प्रमाणात हाताळणी सुविधेसह स्टील सायलो स्टोअरेज मोठ्या प्रमाणात अन्नधान्य साठविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे धान्याचे संरक्षण होते, साठवण कालावधी वाढतो. अन्नधान्य सायलोमध्ये साठविले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक केली, तर चोरी, वाहतुकीमुळे होणारे नुकसान गोदामांतील पारंपरिक पिशव्यांमध्ये धान्य साठवणुकीच्या तुलनेत नगण्य आहे. भारतीय अन्न महामंडळाकडे जमिनीची उपलब्धता कमी आहे, पारंपरिक गोदाम उभारणीच्या तुलनेत गोदामास १/३ जागा कमी लागत असल्याने आवश्यकतेनुसार सायलोमधील अन्नधान्याची साठवणूक फायदेशीर ठरते.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT