Silk Fund Market Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming :रेशीम उद्योगाने उघडल्या रोजगाराच्या नवनवीन संधी

Sericulture : दूध व ऊस या पिकांबरोबर शेतकऱ्यांना शाश्‍वत हमीभाव असलेल्या पिकांची गरज असून रेशीम उद्योगातून नवीन क्षेत्र खुले होत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : दूध व ऊस या पिकांबरोबर शेतकऱ्यांना शाश्‍वत हमीभाव असलेल्या पिकांची गरज असून रेशीम उद्योगातून नवीन क्षेत्र खुले होत आहे. हलकी जमीन व कमी पाण्यात तुती लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास छोट्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला व्यवसाय ठरणार असून या रेशीम उद्योगातून चांगल्या उत्पन्नासह रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जिल्हा रेशीम कार्यालय व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महारेशीम अभियान अंतर्गत ‘तुती लागवड व कीटक संगोपन माहिती व मार्गदर्शन’ कार्यशाळा झाली. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, रेशीम तज्ञ तथा आंतरराष्ट्रीय सल्लागार प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव, बारामतीच्या केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. हुमायून शरीफ, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, तालुका कृषी अधिकारी रेजी बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, की अहिल्यानगर जिल्ह्यात कमी पाणी आणि हलके शिवार असलेल्या क्षेत्रात तुती पिकासाठी मोठा वाव आहे. शेतकऱ्यांना दूध व ऊस या व्यतिरिक्त शाश्वत हमीभाव मिळवून देणारे हे पीक आहे. छोट्या शेतकऱ्यांना परवडेल असा हा चांगला व्यवसाय आहे . घरातील महिला आणि लहान या रेशीम उद्योगात काम करू शकतात.

यातून नवीन क्षेत्र खुले होणार असून, सुरुवात जरी लहान असली, तरी आगामी काळात रेशीम उद्योगाचे क्षेत्र विस्तीर्ण आणि मोठे होणार आहे. संगमनेर तालुक्यामध्ये तुती लागवड याचबरोबर कोश निर्मिती आणि रेशीम उत्पादन याला मोठी संधी असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत हा कृषी व्यवसाय बळकटी देणारा आहे.

शासनाचा कृषी विभाग, रेशीम विभाग व कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त तुती लागवड करण्यासाठी काम करा यावर प्रक्रिया निर्मिती केंद्र या ठिकाणी सुरू केल्यास नक्कीच भविष्यात रेशीम उद्योग हा मोठा व्यवसाय ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रेशीमला मोठी मागणी असून, या मागणीची आपल्या तरुण शेतकऱ्यांसाठी रोजगाराची व शाश्वत उत्पादनाची ही मोठी संधी ठरणार आहे. या वेळी शास्त्रज्ञ डॉ. हुमायून शरीफ, रेजी बोडके यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात उत्कृष्ट रेशीम उत्पादन घेणाऱ्या १५ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Water Budgeting: समृद्ध गावशिवारासाठी पाण्याचा ताळेबंद

FPO Success Story: विविध उपक्रमांमधून ‘सातबारा’ कंपनीची आश्‍वासक वाटचाल

Post Harvest Management: काढणीपश्चात तंत्रज्ञानाची सद्यःस्थिती अन् आव्हाने

Spice Business Success: बीटेक पदवीधराचा ‘अष्टगुण मसाले’ ब्रॅंड

Mushrooms Health Benefits: पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी अळिंबी

SCROLL FOR NEXT