Baramati Silk Market : बारामती बाजार समितीत रेशीम कोषास झळाळी

Silk Rate : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम बाजारामध्ये गुरुवारी (ता. ३) रेशीम कोषास प्रति किलोस ७७० असा उच्चांकी बाजार मिळाला.
Silk Cocoon Production
Silk Cocoon ProductionAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम बाजारामध्ये गुरुवारी (ता. ३) रेशीम कोषास प्रति किलोस ७७० असा उच्चांकी बाजार मिळाला. बाजारात ४४५ किलो रेशीम कोषाची आवक झाली.

या वेळी किमान ४५० रुपये आणि सरासरी ७२० प्रतिकिलो दर निघाले. चंद्रकांत दत्तू गुळुमकर (रा. साबळेवाडी, ता. बारामती) यांच्या कोषास प्रतिकिलोस ७७० रुपये दर मिळाला. त्यांना एक लाख ७८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कोष विक्रीस आणताना ग्रेडिंग व स्वच्छ करून आणावा, म्हणजे कोषास जादा दर मिळेल. तसेच शेतकऱ्यांनी परस्पर बाहेरील व्यापाऱ्यांना कोष विक्री करू नये. आपला कोष रेशीम कोष बारामती बाजारातच विक्री करावा.

Silk Cocoon Production
Silk Farming : हिंगोली जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरुवात

बारामती रेशीम कोष बाजारामध्ये ई-नाम प्रणाली सुरू असल्याने चांगली विक्री व्यवस्था आहे. त्यामुळे इतर व बाहेरील राज्यातील बाजारांप्रमाणे दर मिळत आहेत. बारामती बाजार समितीतर्फे शेतकरी व रिलर्स यांना संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.

रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. त्यांच्या समस्या व अडचणी समजावून घेतल्या व अडचणी सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले, अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीर आगवणे, तसेच बारामती बाजार समितीचे सूर्यकांत मोरे, सोमनाथ जगताप उपस्थित होते.

Silk Cocoon Production
Silk Cocoon : बीडच्या बाजारपेठेत होते राज्यातून रेशीम कोषांची आवक

दीड कोटी रुपयांची उलाढाल

बारामती बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी विक्री ई- नाम प्रणालीद्वारे सुरू असून, डिंसेबर २०२४ व जानेवारी २०२५ या दोन महिन्यात ३०७ शेतकऱ्यांचा २६ टन कोष विक्री झाला असून, दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यात तुती लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. बारामती रेशीम मार्केटमध्ये ऑनलाइन लिलाव व पारदर्शक व्यवहार, अचूक वजन यामुळे शेतकरी कोष घेऊन येत आहेत, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

शासनामार्फत बारामती मुख्य यार्डमध्ये रेशीम कोष बाजार व कोषोत्तर प्रक्रिया, प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी शेतकरी व व्यापाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. बारामती हे भविष्यात रेशीम कोष उत्पादक व रिलर्स करिता एक भव्य बाजारपेठ होणार आहे.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com